आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उंदराने कुरतडले 37 लाख रुपये...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनच्या गुंगडाँग प्रांतातील एका महिलेने घरामध्ये 400000 युआन म्हणजे सुमारे 37,10044 रुपयांच्या नोटा जपून ठेवल्या होत्या. परंतु पांढर्‍या उंदरांनी त्या सर्वच्या सर्व नोटा कुरतडून टाकल्यामुळे हैराण झालेली ती महिला त्या नोटा बदलण्यासाठी फोशान येथील चायना बँकेच्या शाखेत आली. बँकेने तिला 3,40,000 युआनच्या नोटा तर बदलून दिल्या, मात्र 60,000 युआनच्या नोटा बदलून देण्यायोग्य नसल्याचे सांगितले.