आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 4,000 year old Egyptian Statue In UK Museum Moves On Its Own

SPOOKY VIDEO: 4 हजार वर्षांपूर्वीची ममी अचानक स्‍वतःभोवती फिरली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- मँचेस्टरच्या संग्रहालयात एका विचित्र घटनेने खळबळ उडाली आहे. जवळपास 4000 वर्षांपूर्वीच्या एका ममीने अचानक हलचाल केली. या गूढ घटनेमुळे जगभरातल्या पुरातत्ववेत्त्यांचे लक्ष वेधल्‍या गेले आहे. ही ममी सुमारे 80 वर्षांपासून या संग्रहालयात आहे. काल ही ममी अचानक 180 अंश कोनामध्‍ये आपोआप फिरली.

मँचेस्‍टरच्‍या संग्रहालयात 10 इंच उंचीची नेब-सेनू नामक एक गूढ ममी आहे. ममी काचेच्‍या एका शेल्‍फमध्‍ये ठेवण्‍यात आली आहे. ममी इ.स.पू. 1800च्‍या काळातील आहे. काही आठवड्यांपासून ममीची हालचाल होत आहे. संग्रहालयाच्‍या अधिका-यांना हे जाणवल्‍यानंतर हालचालींकडे सीसीटीव्‍हीच्‍या माध्‍यमातून लक्ष ठेवण्‍यात आले. हालचालींमुळे सर्वप्रथम अधिकारी भयभीत झाले होते. प्रत्‍येकवेळी अधिका-यांना ममीची समोरील बाजून विरुद्ध दिशेने 180 अंशांच्‍या कोनात सरकल्‍याचे सातत्‍याने जाणवले.

यासंदर्भात कॅम्‍पबेल प्राईस या अधिका-याने सांगितले की, मला एका दिवशी ममी फिरल्‍याचे लक्षात आले. त्‍यावेळी काहीसे विचित्र वाटले. मी ममीला पूर्वीप्रमाणे फिरवून ठेवले. परंतु, दुस-या दिवशी ममी पुन्‍हा फिरल्‍याचे दिसले. त्‍यामुळे सीसीटीव्‍हीमध्‍ये त्‍यावर लक्ष ठेवण्‍यात आले. सीसीटीव्‍ही फुटेज पाहिल्‍यानंतर धक्‍काच बसला. ममी स्‍वतःभोवजी 180 अंशांच्‍या कोनात फिरल्‍याचे त्‍यात स्‍पष्‍ट दिसले. हे फुटेज वारंवार तपासण्‍यात आले. ममीची हालचाल उघड्या डोळ्यांनी लक्षात येत नाही. परंतु, सीसीटीव्‍ही फुटेजची गती वाढविल्‍यास हालचाल स्‍पष्‍टपणे दिसते.

जवळपास कुणीही नसताना तसेच कुणीही धक्‍का दिलेला नसतानाही अचानक ममी स्वतःहून 180 अंशांमध्‍ये फिरली. त्‍यावेळेस ममीच्‍या बाजुलाही कोणी उभे नव्‍हते. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पुनःपुन्हा तपासण्यात येत आहे.


या बातमीत दिलेल्‍या व्हिडिओमध्‍ये तुम्‍ही ममीची हालचाल स्‍पष्‍ट पाहू शकता.