आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 52 Year Old Who Really DOES Look Like She Is In Her Twenties

PHOTOS: 25 नव्हे 52 वर्षांची आहे ही महिला, लोक समजतात मुलाची गर्लफ्रेंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पामेल जॅकब)
लंडन- ब्रिटेनच्या लीड्सची रहिवासी पामेल जॅकेबला पाहून ती 21 वर्षांच्या मुलाची आई आहे, यावर विश्वास बसणार नाही. परंतु हे सत्य आहे. पामेला इतकी फिट आहे, की तिचे वय 25 वर्षांपेक्षा जास्त वाटत नाही. मात्र वास्तविकरित्या पामेला 52 वर्षांची आहे. पामेला सांगते, की अनेकदा लोकांनी मला टोमणे मारले. त्यांना वाटते, की मी अद्याप तरुणच आहे. पण लोकांना मी माझे वय सांगितले, तर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. याबाबत तिला अनेकदा खोटारडी असेही म्हटले जाते.
जॅकबच्या सांगण्यानुसार, अनेकदा तिने मुलगा मार्लेसोबत प्रवास करत असताना लोक दोघांना गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड समजतात. ब-याचवेळा असे ऐकून तिची लाजेने मान खाली झुकते. मात्र तिला आनंद आहे, की वयाच्या 52व्या वर्षीसुध्दा ती 25 वर्षांची दिसते. लोकांना वाटते, की पामेला एखाद्या तरुणाला डेट करत असावी. परंतु मला माझ्या वयाच्या लोकांचेच आकर्षण आहे. लग्नानंतर काही दिवसांतच तिचा घटस्फोट झाला आहे.
एका घटनेविषयी सांगताना पामेला सांगते, की एकदा ती रेल्वे तिकीट घेण्यासाठी गेली असता, तिला विद्यार्थी असल्याचे ओळखपत्र मागितले. त्यांना वाटले, की पामेला विद्यार्थीनी आहे. मात्र पामेलाने जेव्हा स्वत:चे खरे वय सांगितले तेव्हा त्यांनी तोंडात बोट घातले. अशीच एक घटना हॉस्पिटलमध्येसुध्दा घडली होती. हॉस्पिटलमधील एका नर्सने तिच्या वयावर विश्वास ठेवण्यास नकार दिला होता. नर्सने मेडिकल रेकॉर्ड्स पाहून सांगितले होते, की असे कसे होऊ शकते, की तू 52 वर्षांची असूनसुध्दा इतकी तरुण दिसतेस.
नारळाच्या तेलाचा करते वापर-
पामेलाने सांगितले, की ती हेल्टी डायट तर घेतेच सोबतच व्यायामसुध्दा करते. जेणेकरून तिची फिगर मेंटन राहू शकेल. एवढेच नव्हे पामेला नारळ तेलाचासुध्दा वापर करते. ती सांगते, केसांना लावण्यापासून जेवण बनवण्यापर्यंत सर्वांसाठी ती नारळ तेलाचा वापर करते. शिवाय, प्रत्येक आठवड्यात चेह-याचे स्टिम करण्यासोबतच प्रत्येक दुस-या दिवशी चेह-याला मऊ कपड्याने स्वच्छ करते. तसेच बाहेर जाण्यापूर्वी त्वचेला सनस्क्रिन क्रिम लावते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या 52व्या वर्षी तरुण दिसणा-या या महिलेचे PHOTOS...