तुम्हाला माहिती आहे का, दिवसभर काम करून झाल्यानंतर सर्वात जास्त शांती कुठे मळते? जेव्हा
आपल्याला आपले घर आणि विशेषतः आपली बेडरूम दिसते. आपण बेडरूममध्ये जाऊन बेडवर पडल्यानंतर कामाचा सर्व क्षीण गेल्याचे जाणवते. परंतु वेगवेगळ्या देशांमध्ये लोकांच्या बेडरूमची बनावट वेगवेगळी असते. अशाच काही फोटोंसोबत एक पुस्तक पब्लिश करण्यात आले आहे. या पुस्तकामध्ये जगभरातील वेगवेगळ्या देशांमधील लोक कुठे झोपतात हे दर्शवणारे फोटो आहेत. हा प्रोजेक्ट दक्षिण आफ्रिकेचे प्रसिद्ध फिल्ममेकर आणि फोटोग्राफर जॉन थॅकव्रे (John thakwray) यांचे स्वप्न होते. हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी जॉन मागील सहा वर्षांपासून देश-विदेशात फिरत असून आतापर्यंत त्यांनी 55 देशात जाऊन फोटो काढले आहेत.