आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

55 वर्षांची महिला बनली ब्युटी क्वीन, यामुळे तिच्यावर फिदा झाले जजेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सूजी डेंट 55 वर्षांची आहे. ती फार स्लिमही नाही. संपूर्ण आयुष्य ती टॉमब्वॉयसारखे जगली आहे. ती ब्युटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेऊ शकेल असे वाटतही नाही. पण तिने फक्त भागच घेतला नाही तर एका आंतरराष्ट्रीय ब्युटी कॉन्टेस्टचे टायटलही तिने जिंकले. ऑस्ट्रेलियाची सुजी लास वेगास (अमेरिका) मध्ये आयोजित मिसेज अर्थ ब्युटी कॉन्टेस्टमध्ये तिसऱ्या स्थानावर राहिली. 36 देशांच्या स्पर्धकांमध्ये तिने मिसेज अर्थ हेल्थचे टायटल मिळवले. तिच्या स्पर्धेत अनेक स्विम सूट मॉडेल आणि मिस वर्ल्ड फायनलिस्ट होत्या. हे आहे सुजीचे वैशिष्ट्य.. 

पुरुष जज म्हणाले, तुम्ही आमच्या कल्पनेप्रमाणे.. 
- सूजी डेंटने मार्चमध्ये मिसेस अर्थ ऑस्ट्रेलियाचा किताब जिंकला होता. ती तिच्या जीवनातील पहिलीच ब्युटी कॉन्टेस्ट होती. 
- 55 वर्षांची सुजी क्वीन्सलँडमध्ये मेकअप आणि वार्डरोब एक्सपर्ट म्हणून 25 वर्षांपासून काम करत होती. तिच्या लग्नालाही जवळपास तेवढीच वर्षे झाली आहेत. तिला एक 15 वर्षांचा मुलगाही आहे. 
- सुजी इतरांचा मेकअप करते. पण तिने कधीही स्वतःच्या सौंदर्याकडे लक्ष दिले नाही. ती आयुष्यभर टॉमबॉयसारखी राहिली. 
- पण तिला जेव्हा मॉडेलिंगची संधी मिळाली तेव्हा तिने लगेचच होकार दिला. तोच फोटो पाहून मिस आणि मिसेस अर्थ ऑस्ट्रेलियाच्या आयोजकांनी तिला संपर्क केला. 
- सुजीने कधी याबाबत विचारही केला नव्हता. पण नंतर जेव्हा तिला समजले की, मिसेस अर्थ कॉन्टेस्ट गरीबांची मदत करणाऱ्या एका एनजीओला सपोर्ट करते तेव्हा तिने होकार दिला. 
- मिसेज अर्थ ऑस्ट्रेलियाचा किताब जिंकल्यानंतर तिला मिसेस अर्थ कॉन्टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करण्याची संधीही मिळाली. 
- लास वेगासमध्ये आयोजित या स्पर्धेत प्रेक्षक आणि जजेस सगळ्यांनीच सुजीचे तोंडभरुन कौतुक केले. पुरुष जजेसनी तर तिला त्यांच्या कल्पनेतील महिला अगदी अशीच असते असे म्हटले. 
- सुजीचा आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणाने सर्वांनाच थक्क करून सोडले. ब्युटी क्वीन बनण्यासाठी मॉडेल, स्लिम फिगर असण्याची किंवा बोटोक्सचीच गरज नसते, हे तिने सिद्ध केले. 
- सुजी आता मोटिव्हेशनल स्पिकर म्हणून कार करू इच्छिते. विशेषतः ज्येष्ठ आणि महिलांना प्रेरणा देण्याची तिची इच्छा आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, सुजी डेंटचे इतर काही PHOTOS... 
बातम्या आणखी आहेत...