आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉलसोबत खेळायचा असा खेळ, 72 वर्षांच्या वृद्धाला जावे लागले जेलमध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाइल्ड सेक्स डॉलसोबत अश्लिल चाळे केल्या प्रकरणी 72 वर्षांच्या डेव्हिडला शिक्षा झाली. - Divya Marathi
चाइल्ड सेक्स डॉलसोबत अश्लिल चाळे केल्या प्रकरणी 72 वर्षांच्या डेव्हिडला शिक्षा झाली.
भारतात गेल्या काही दिवसांमध्ये 7 ते 10 वर्षांच्या मुला-मुलींचे शाळेत लैंगिक शोषण झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणांमध्ये शाळेने सुरुवातीला प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न केला होता. भारतात लहान मुलांसोबतच्या प्रकरणांमध्ये असे घडत असताना इंग्लंडमध्ये एका 72 वर्षांच्या व्यक्तीला 'डॉल' खरेदी केल्याने अटक करण्यात आली आहे. कारण ही साधारण डॉल नव्हती तर चाइल्ड सेक्स डॉल होती. पश्चिमी देशांमध्ये सेक्स डॉल बाळगणे वैध आहे मात्र चाइल्ड सेक्स डॉलचे हे प्रकरण असल्यामुळे या व्यक्तीला शिक्षाही झाली आहे. यावरून दिसून येते की पश्चिमी देशातील कायदे मुलांबाबत किती संवेदनशील आहे. 
 
काय आहे प्रकरण 
- इंग्लंडमधील राम्सगेड शहरातील 72 वर्षांचा डेव्हिड टर्नर याने चाइल्ड सेक्स डॉल खरेदी करुन डॉलसोबत सेक्स केल्याच्या आरोपात त्याला 16 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 
- इंग्लंडमधील नॅशनल क्राइम एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी डेव्हिडच्या घरी छापा टाकला तेव्हा समोर आले की तो एका चाइल्ड सेक्स डॉलसोबत झोपत होता. त्यासोबतच त्याच्या घरातून 29 पत्र जप्त करण्यात आली आहेत.  लहान मुलांसोबतच्या अश्लिल कृत्याच्या कथा त्याने या पत्रांमध्ये लिहिलेल्या होत्या.
- टर्नरला गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हा तो सेंट एथेलबर्ट चर्च प्रायमरी स्कूलचा प्रशासक आणि चर्च वॉर्डन म्हणून कार्यरत होता. अटकेनंतर त्याने राजीनामा दिला होता. 

असे उघड झाले प्रकरण 
- डेव्हिडच्या नावाने चीनवरुन एक पार्सल आले होते. विमानतळावरच तपास अधिकाऱ्यांनी ते पार्सल जप्त केले होते. त्यामध्ये 3 फूट 10 इंचाची चाइल्ड सेक्स डॉल होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी डेव्हिडच्या घरी छापा टाकला त्यात अनेक धक्कादाक बाबी आढळल्या होत्या. 
- अधिकाऱ्यांनी चाइल्ड सेक्स डॉलसोबतच त्याच्या घरातून 34 हजार अश्लिल आणि अभद्र फोटो जप्त केले. हे सर्व फोटो त्याने प्रायमरी शाळेत प्रशासक असतानाच्या काळात काढले होते. शाळेतीलच मुलांचे लपून-छपून तो फोटो घेत होता. त्याच्या कॉम्प्यूटरमध्येही अनेक आक्षेपार्ह्य बाबी सापडल्या. 
- डेव्हिडने चाइल्ड सेक्स डॉलसाठी अंडरगारमेंट खरेदी केल्याचे आणि या डॉलसोबत सेक्स केल्याचे कोर्टात कबूल केले.
- या प्रकरणावरुन दिसून येते की पश्चिमी देशांमध्ये लहान मुलांच्या सुरक्षेची आणि त्यांच्या सन्मानाची किती काळजी घेतली जाते. त्याबाबत तेथील यंत्रणा आणि न्याय व्यवस्था किती संवेदनशील आहे, की डॉल सोबतचे अश्लिल कृत्यही गुन्हेगारी स्वरुपाचे मानले जाते. 
  
बातम्या आणखी आहेत...