आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 7ft 4inch Tall Chinese Bachelor Wang Qiang Found 5ft 1inch Girlfriend Xiao Hong

अखेर 7 फूट 4 इंच उंचीच्या चीनी तरुणाला गवसली गर्लफ्रेंड!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरुण असो किंवा तरुणी, प्रत्येकाला आपण उंच-देखणे असावे वाटत असते. मात्र गरजेपेक्षा जास्त उंची अडचणीचे कारण ठरते. या चीनी तरुणासोबतसुद्धा असेच घडले आहे. 7 फूट 4 इंच उंचीच्या वांग शियांगपासून तरुणी दूर पळायच्या. त्यामुळे तो अद्याप एकदा होता. वांगला एका जवळच्या प्रेमळ व्यक्तिची गरज होती. मात्र उंचीमुळे त्याला गर्लफ्रेंड गवसत नव्हती. त्याने गर्लफ्रेंड मिळवण्यासाठी चक्क मीडियात जाहिरातसुद्धा दिली. अखेर वांगची ही कल्पना यशस्वी झाली आणि व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी त्याला गर्लफ्रेंड मिळाली. वांगच्या या गर्लफ्रेंडची उंची 5 फूट 1 इंच असून तिचे नाव जियाओ होंग असे आहे.
जियाओने वांगची जाहिरात बघितली होती. तीसुद्धा एका ग्रेट व्यक्तिच्या शोधात होती. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी वांग जेथे काम करतो त्या हुलू माउंट सीनिक पार्कमध्ये जाण्याचा तिने निर्णय घेतला.
वांगने सांगितले, की उंची आणि गरिबीमुळे त्याच्या आयुष्यात कुणीही नव्हते. आजारामुळे वांगची उंची वाजवीपेक्षा अधिक वाढली. वांगला पिट्युटरी ट्युमर होता. मात्र त्यावर यशस्वी उपचार झाले असून भविष्यात त्याची उंची वाढणार नाहीये. वांगच्या कंपनीत काम करणारे कर्मचारी त्याच्या लग्नाचा खर्च उचलण्यासाठी तयार आहेत.
7 फूट 4 इंच उंचीचा चीनी तरुण आणि 5 फूट 1 इंच उंचीच्या त्याच्या गर्लफ्रेंडची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...