आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 82 Year Old Billy Standley Buried With His Beloved Harley Davidson

आगळीवेगळी अंतिम इच्छा : 82 वर्षीय वृद्धाला लाडक्या हर्ले डेव्हिडसनसह केले दफन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील ओहियो येथे राहणा-या एका कुटुंबाने त्यांच्या घरातील 82 वर्षीय वृद्धाची एक अनोखी अंतिम इच्छा पूर्ण केली आहे. 82 वर्षीय बिली स्टेनडली यांची शेवटची इच्छा होती, की त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मृतदेहासह त्यांची आवडती बाइक हार्ले डेविडसनही दफन करण्यात यावे.
एका वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या बातमीनुसार, स्टेनडली यांचे 26 जानेवारी रोजी कर्करोगाने निधन झाले. त्यांची दोन मुले पेटे, राय आणि मुलगी डॉर्थी यांनी त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी एका वेगळ्या पद्धतीने त्यांची अंत्ययात्रा काढली आणि त्यांच्या अंतिम इच्छेनुसार, त्यांचा मृतदेह त्यांच्या बाइकसह दफन केला गेला.
बिली स्टेनडली यांच्या अंत्ययात्रेत त्यांचे शव त्यांच्या 1967च्या हर्ले डेव्हिडसन इलेक्ट्र ग्लाइड क्रूजर बाइकवर ठेवण्यात आले. त्यांच्या मृतदेहावर लेदर कपडे आणि सनग्लास घालण्यात आले. त्यांच्या मृतदेहाला मागून मेटलच्या बॅक ब्रासने सपोर्ट देण्यात आला होता. लांबून बघितल्यास बाइकवर मृतदेह नव्हे तर एक जिवंत व्यक्ती बसला आहे, असं दृश्य दिसत होतं. स्टेनडली यांचा मृतहेद एका मोठ्या काचेच्या बॉक्समध्ये ठेवण्यात आला होता. जेव्हा त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली, त्यावेळी त्यांच्या मागे अनेक बाइकर्स त्यांच्या सन्मानार्थ बाइकवरुन येत होते.
ओहियोतील रहिवाशी असलेल्या स्टेनडली यांनी पाच वर्षांपूर्वी आपली ही इच्छा आपल्या कुटुंबीयांकडे व्यक्त केली होती. स्टेनडली एक रोडियो राइडर होते आणि सेफ्टी ड्रेसविना बाइक चालवत होते.
छायाचित्रे साभार : स्काय न्यूज
ही बातमी पुढे वाचण्यासाठी आणि स्टेनडली यांच्या अंत्ययात्रेची छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...