आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 94 Year Old Driving Instructure Laura Thomas Of Uk

ब्रिटनमधील 94 वर्षीय आजीचा दांडगा उत्साह लोकांना देते ड्राइव्हिंग धडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटनच्या वेल्समध्ये राहणारी 94 वर्षांच्या लारा थॉमस 76व्या वर्षीपासून लोकांना ड्राइव्हिंग शिकवत आहेत. आज त्या ब्रिटनमध्ये सर्वाधिक चर्चेत आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्याकडून आजपर्यंत एकही अपघात घडलेला नाही. लॉरा म्हणतात, की त्यांना नात-नातू आहेत. तेसुध्दा त्यांच्याकडूनच कार ड्राइव्हिंग शिकत आहेत.
लॉरा यांना ड्राइव्हिंगची आवड आहे. त्यामुळे त्यांचे वय किती याचा त्यांच्या कामावर काही परिणाम पडत नाही. त्या म्हणतात, तुम्ही तुमच्या कामा प्रति सक्रिय राहिलात तर वयाचा तुमच्या कामावर काहीच परिणाम पडत नाही. आतापर्यंत त्यांनी एक हजारांपेक्षा अधिक लोकांना ड्राइव्हिंगचे धडे दिले आहेत. त्यांनी अशाप्रकारे ड्राइव्हिंगचे शिक्षण दिले आहे, की त्या लोकांना इतरांकडून आपली ड्राइव्हिंग तपासून घ्यावी लागत नाही. कार ड्राइव्हिंग शिकवण्यासाठी ल़ॉरा यांनी कधीच ड्यूल कंट्रोलचा वापर केला नाही.
लॉरा यांना 1938मध्ये त्यांच्या भावाने ख्रिसमसच्या मुहूर्तावर कार खरेदी करून दिली होती. त्यानंतर त्यांना ड्राइव्हिंगचा छंद जडला. त्या म्हणतात, आज उद्योगांमध्ये बरेच बदल झालेले दिसून येत आहेत. रस्त्यांवर तर जागाच नसते. इतक्या गाड्या धावताना दिसतात. परंतु ड्राइव्हिंगचे बेसिक बदलले नाहीत. लॉरा यांनी कधीच स्वत:चा प्रचार केला नाही. त्यांच्याकडे शिकायला येणा-या लोकांनीच त्यांना प्रसिध्द केले. परंतु त्या सध्या इतक्या व्यस्त आहेत, की त्यांनी इतर कामांसाठी वेळ देणे मुश्किल झाले आहे.
कार ड्राइव्हिंग प्रशिक्षिका 94 वर्षीय आजीची काही खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...