आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • रोज शाळेत उशिरा यायचा विद्यार्थी, नाराज होऊ शिक्षक मारायचे छडी; कारण समजल्यावर झाला पश्चात्ताप Teacher Punishes Student For Being Late

रोज शाळेत उशिरा यायचा विद्यार्थी, नाराज होऊ शिक्षक मारायचे छडी; कारण समजल्यावर झाला पश्चात्ताप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियावर एक शॉर्ट फिल्म व्हायरल होत आहे. यात एका शाळेत दररोज लेट येणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षा दिली जाते. दररोज शिक्षक त्याला छडीने मारत असतात, परंतु तो काही वेळेवर येत नाही. तो सारखा उशिरानेच शाळेत येत होता. सुरुवातीला शिक्षकाला वाटले की, हा मुलगा बहुधा आळशी आहे, यामुळे उशिरा येतो. त्यामुळे शिक्षकानेही त्याला कधी कारण नाही विचारले. परंतु जेव्हा शिक्षक स्वत: तो विद्यार्थी उशिरा का येतो याचे कारण तपासतात, तेव्हा त्यांना स्वत:चीच लाज वाटू लागते. ही शॉर्ट फिल्म यूट्यूबवर फहाद मकसूसी यांनी पोस्ट केली आहे. 

कारण समजल्यावर कंठ आला दाटून...
- एका दिवशी शिक्षक सकाळी जॉगिंगसाठी जात असताना त्यांना उशिरा येणारा तो विद्यार्थी सायकलवर जाताना दिसतो. तो नेमके काय करतोय हे पाहण्यासाठी शिक्षक त्याचा पाठलाग करतात.
- त्याचे मागे-मागे जाताना शिक्षकाला जे दिसते, ते पाहून त्यांला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप होतो. तो मुलगा सकाळी-सकाळी वर्तमान पत्रे वाटत होता, यामुळेच त्याला उशीर व्हायचा. पुन्हा जेव्हा तो मुलगा शाळेत उशिरा येतो तेव्हा शिक्षक त्याला शिक्षा करण्याऐवजी रडतच गळाभेट घेतात.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या कहाणीचा Video.. 

बातम्या आणखी आहेत...