आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAK अँकरने स्वतःच्या लहानगीला घेऊन केले अँकरिंग, बलात्काराच्या घटनेने झाली संतप्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानातील 'समा' टीव्ही न्यूज चॅनलच्या अँकरने सध्या आंतरराष्ट्रीय मीडियाचे लक्ष वेधून घेतल आहे. न्यूज अँकर किरण नाज यांनी स्वतःच्या लहान मुलीला स्टुडिओत आणले आणि तिच्यासह जैनबसोबत झालेल्या घटनेने एका आईला किती दुःख झाले आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला. 

 

किरण नाज यांचा व्हिडिओ शेअर करत पाकिस्तानी पत्रकार उमर कुरैशी यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले, 'याआधी खचितच तुम्ही एखाद्या टीव्ही अँकरला स्वतःच्या मुलीसह स्टुडिओमध्ये पाहिले असेल. मात्र समा टीव्हीच्या अँकर किरण नाज आपल्या लहानगीला घेऊन स्टुडिओत पोहोचल्या आणि त्यांनी सांगितले की एक आई म्हणून त्यांना काय दुःख होत आहे.'

लहानग्या मुलीसह न्यूज अँकरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. पाकिस्तानपासून भारतातही सोशल मीडिया यूजर्स न्यूज अँकरचे कौतूक करत आहेत. लोक म्हणत आहेत की तिच्या शब्दांनी आणि चेहऱ्यावरील दुःखाने डोळ्यात आसवं दाटली आहे. 
दीपक जसवाणीने अँकरने मुलीसह केलेल्या बुलेटीनचे जोरदार कौतूक केले आहे. ते म्हणाले, अशी रिपोर्टिंग भारतात पाहाण्याची अपेक्षा आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...