आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइराणच्या जवळील अजरबेजानच्या नाफतलान शहरात एक असे हेल्थ सेंटर आहे, जिथे लोक क्रूड ऑइलने भरलेल्या बाथटबमध्ये अंघोळ करतात. सेंटरचे विषेतज्ञ दावा करतात, की क्रूज ऑइल न्यूरॉलॉजिक आणि स्किन प्रॉब्लेमसह 70पेक्षा जास्त आजार दूर होतात. ही खास चिकित्सा घेण्यासाठी येथे रशिया, कजाकिस्तान, जर्मनीसह इतर देशांतून लोक येथे पोहोचतात.
विशेष म्हणजे, अजरबेजान जगात तेलाची निर्यात करणारे मुख्य देशांपैकी एक आहे. येथे लोक त्वचेच्या आजाराशिवाय आर्थराइटिस आणि नसांचे आजारदूर करतात. क्रूज ऑइलचा विविध आजारांवर उपचार केला जातो. परंतु सर्वात लोकप्रिय पध्दत म्हणजे, बाथ. त्यासाठी एका रुग्णाला जवळपास 40 डिग्री तापमानावर 130 लीटर तेलात अंघोळ करतात.
अनेक लोकांनी उपचारानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले, की गरम तेलाने रुग्णांना हाडांना आराम मिळतो. काही लोकांनी ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ तेलामध्ये बसण्याची इच्छादेखील व्यक्ती केली. परंतु त्यामधील विविध केमिकल्समुळे या बाथटबध्ये जास्त वेळ अंघोळ करणे धोकादायक आहे. एवढेच नव्हे असे केल्यास मृत्यू होण्याचीसुध्दा शक्यता असते.
क्लिनिकच्या डॉक्टारांचे म्हणणे आहे, की काही वर्षांमध्ये हजारो लोकांनी येथे उपचार घेतले आहेत. त्यांचा दावा आहे, की कोणत्याही व्यक्तीवर याचा वाईट परिणाम जाणवला नाहीये. एका डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, आम्ही एका रुग्णाला एका दिवसात केवळ एकदाच बाथटबसाठी परवानगी देतो आणि तेही फक्त १० मिनीटांसाठी. क्रूड ऑइलने अंघोळ करण्याचा १० दिवसांचा कोर्स असतो.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा या बाथटबमध्ये अंघोळ करणा-या लोकांचे PHOTOS...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.