आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारमध्ये असा अडकवला असेल Coin तर लगेच व्हा सावध, जाणून घ्या या Viral मॅसेजचे सत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियावर अनेक दिवसांपासून एक मॅसेज फिरतोय. तुम्हाला कारच्या हँडलमध्ये जर कॉइन अडकलेला दिसला तर लगेचच सावध व्हा आणि पोलिसांना बोलवा असा या मॅसेजचा मजकूर असतो. या मॅसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, कारच्या दाराच्या हँडलमध्ये कॉइन अडकवून गुन्हेगार चोरी सारखी घटना घडवू शकतो. पण खरंच ते शक्य आहे का, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


या इशाऱ्यानुसार नेहमी गाडी घेऊन जाताना तिचे चारही दरवाजे व्यवस्थित चेक करायला हवे. कारण एखाद्याने कारच्या हँडलमध्ये कॉइन अजडकवलेला असू शकतो. ही कार चोरीची नवी पद्धत असल्याचा दावा मॅसेजमध्ये केला जात आहे. हा कॉइन अडकवल्याने तुम्ही जेव्हा रिमोट कंट्रोल सिस्टीमने गाडी लॉक करण्याचा प्रयत्न करता तेव्हा सर्व दरवाजे लॉक होतात पण कॉइन अडकवलेला दरवाजा लॉक होत नाही. याच दारातून आत जाऊन चोरटे गाडी चोरतात  असे मॅसेजमध्ये म्हटले आहे. 


अशा प्रकारचा दावा केल्यानंतर हा मॅसेज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा मॅसेज जास्तीत जास्त शेअर करण्याचे अपीलही केले जात आहे. लोकही हे सर्व खरं आहे का याचा विचार न करता ते शेअर करतात आणि मॅसेज अधिक व्हायरल होतो. 


जाणून घ्या, काय आहे सत्य
एक्सपर्ट्सच्या मते अनेक वर्षांपासून केला जाणारा हा दावा कायम खोटा ठरलेला आहे. टीमने जेव्हा कार एक्सपर्ट्सशी याबाबत चर्चा केली तेव्हा ते तर हसायलाच लागले. त्यांनी सांगितले की, हे शक्यच नाही. विशेषतः नव्या मॉडेल्सच्या कारमध्येतर कॉइन अडकवणेही शक्य नाही. फारच प्रयत्नाने तसे झाले तरी गाडीच्या लॉक मॅकेनिझमवर त्याचा परिणाम होत नाही. आणखी एका कार कंपनीच्या इंजिनीअरने सांगितले की, कॉइनने कार लॉक न होणे अशक्य आहे. ते म्हणाले जरी हे फार जुन्या कारमध्ये होत असेल तरी ते आजघडीला शक्य नाही. आजच्या काळात रिमोट कंट्रोल लॉकिंग अडवणे शक्यच नसते. त्यामुळे अशा अफवांवर लक्ष द्यायला नको. 

बातम्या आणखी आहेत...