आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्याकडेच नव्हे परदेशातही चालते चिटींग, पाहा कॉपी करण्याच्या अनोख्या पध्दती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पण चिटींगसाठी अक्कलच नव्हे तर हिंमत सुध्दा लागते बरं... - Divya Marathi
पण चिटींगसाठी अक्कलच नव्हे तर हिंमत सुध्दा लागते बरं...

सध्या महाराष्ट्रात परीक्षांचा काळ आहे. बारावीची परीक्षा संपली आहे तर दहावीची परीक्षा अंतिम टप्प्यात आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही कॉपीचे प्रकार उघडकीस आले. खासकरून सोलापूर, लातूर, उस्मानाबाद आदी पट्ट्यात कॉप्यांचे प्रकार दिसून आले. तसं तर महाराष्ट्रात कॉपी करण्याचे प्रकार तसे कमी घडतात. बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आदी राज्यांत 100 टक्के विद्यार्थी कॉपी करतात असे सांगितले जाते. यूपी, बिहारमध्ये ता राजकीय मुद्दा बनतो. काही वर्षापूर्वी रूबी नावाचा विद्यार्थी बिहारमध्ये टॉपर आला होता पण त्याला नीट वाचताही येत नव्हते हे सा-या जगाने पाहिले.

 

पण हा कॉपी, नकल करणे हा प्रकार फक्त महाराष्ट्र अथवा आपल्या देशातच नाही तर जगभरात चालतो. काही युरोपीय देशात तर थेट ओपन बुक परीक्षा घेतली जाते. पण बाकी ठिकाणी असे होत नाही. त्यामुळे जगभरात परिक्षेच्या काळात असे चिटींग करणा-यांची काहीच कमतरता नाहीये. चिटींग हा शब्द त्यामुळेच आता सामान्य झाला आहे. परंतु चिटींग करण्याच्या नवनवीन पध्दती कायम समोर येत असतात. भारतात ज्याप्रकारे बिहारमध्ये चिटींग केली जाते, त्याउलट दुस-या राज्यांत आणि इतर देशांत चिटींगचे प्रकार पुढे येतात. मागील काही दशकात टेक्नोसॅव्ही कॉपी प्रकार समोर आले. काळासोबत नवनवीन पध्दती आमलात आणल्या जातात.

 

आज आम्ही तुम्हाला दाखवत आहोत, असेच काही चिटींगसाठी विद्यार्थ्यांनी केलेले काही जुगाड. परीक्षा देण्यासाठी आलेले हे विद्यार्थी चिटींग करतात आणि पकडलेदेखील जात नाहीत.

 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, कसा-कसा जुगाड लावून विद्यार्थी करतात नकल...

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...