आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराया रेल्वे फाटकावर अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यामुळे लोकांच्या मनात दहशतीचे वातावरण आहे. या रेल्वे फाटकवर एखादी अनैसर्गिक शक्ती वास करत असेल असा येथील लोकांचा समज आहे. हे रेल्वे फाटक आहे उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील रामपूर बाजार जवळ.
रात्रीच्यावेळी घराची खिडकीही उघडत नाही लोक...
रामपूर गावातील अनेक लोक घराच्या खिडकीतून रेल्वे फाटक दिसते म्हणून रात्रीच्यावेळी खिडकीही उघडत नाही. एवढी या रेल्वे क्रॉसिंगबद्दल त्यांच्या मनात दहशत आहे.
काय झाले होते येथे....
साधारण 20 वर्षांपूर्वी लग्नाच्या वऱ्हाडाची एक बस रेल्वेक्रॉसिंगवरून जात होती. अचानक क्रॉसिंगच्या ठिकाणी बस फसली आणि त्याचवेळी आलेल्या रेल्वेने बसला जोरदार धडक दिली. बसमधील एकही व्यक्ती जिवंत राहिली नाही. ज्यावेळी रेल्वेने बसला धडक दिली तेव्हा बसमध्ये वऱ्हाडींसोबत काही किन्नर होते. ते तेव्हा नाच-गाणे करत होते. या अॅक्सिडेंटनंतर या ठिकाणी अशाकाही घटना घडत आहेत, की ऐकणार्यांच्या अंगावर काटा येतो. व्हिडिओमध्ये जाणून घ्या संपूर्ण घटना.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.