आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • मानवासाठी अमृत आहे या खेकड्याचे रक्त, 10 लाख रुपये आहे प्रति लिटरची किंमत Horseshoe Crab Blood Saves Millions Of Lives

मानवासाठी अमृत आहे या खेकड्याचे रक्त, 10 लाख रुपये आहे प्रति लिटरची किंमत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॅबमध्‍ये अशाप्रकारे काढले जाते Horse Shoe Crabचे रक्‍त. - Divya Marathi
लॅबमध्‍ये अशाप्रकारे काढले जाते Horse Shoe Crabचे रक्‍त.

पाण्‍यामध्‍ये आढळणारा हॉर्स-शू खेकड्याचे रक्‍त मेडिकल सायन्‍समध्‍ये अमृत समजले जाते. हे रक्‍त निळ्या रंगाचे असते. मात्र दुर्दैव की, याच वैशिष्‍टयामुळे या प्राण्‍याला मोठ्या प्रमाणात मारले जाते. हा जीव घोड्याच्‍या नाळेसारखा दिसतो म्‍हणून याला Horse Shoe Crab म्‍हटले जाते.

 

का समजले जाते रक्‍ताला अमृत?
- या खेकड्याचे वैज्ञानिक नाव Limulus polyphemus आहे. 45 कोटी वर्षांपासून ही प्रजाती अस्तित्‍वात असल्‍याचे म्‍हटले जाते. मात्र तेव्‍हापासून या जीवामध्‍ये कोणताही बदल झाला नाही. मेडिकल सायन्समध्‍ये याचे रक्‍त अँटी बॅक्‍टोरिअल गुणधर्मामुळे मोठ्या प्रमाणात वापरले जाते.

 

या कारणामुळे आहे रक्‍त निळे
- Horse Shoe Crabचे रक्‍त निळे असण्‍याचे कारण म्‍हणजे याच्‍या रक्‍तात कॉपर बेस्‍ड हीमोस्याइनिन (Hemocyanin) असते, ज्‍याचे काम संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पुरवठा करण्‍याचे असते. 
- इतर सजीवांमध्‍ये हीमोग्‍लोबिनसोबत लोह हे काम करते. यामुळे त्‍यांचे रक्‍त लाल असते.

 

10 लाख रु/ लीटर आहे किंमत
- शरीरातील इंजेक्‍ट होणा-या औषधांमधील धोकादायक बॅक्‍टेरिया ओळखण्‍यासाठी या खेकड्याच्‍या रक्‍ताचा उपयोग केला जातो. 
- धोकादायक बॅक्‍टेरियाबाबत या रक्‍ताद्वारे अचुक माहिती दिली जाते. यामुळे औषधांमधील धोकादायक घटकांबाबत आपल्‍याला माहिती मिळते. 
- याच खास वैशिष्‍ट्यामुळे या रक्‍ताची किंमत जवळपास 10 लाख रुपये प्रति लिटर एवढी आहे. दरवर्षी 5 लाखापेक्षा अधिक खेकड्यांचे अशाप्रकारे रक्‍त काढले जाते.


पुढील स्‍लाइडवर पाहा, कसे काढले जाते यांचे रक्‍त... 

बातम्या आणखी आहेत...