आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिशिंग करत होते, तेवढ्यात समोरून वेगात आला मृत्यू, पुढे काय झाले तुम्हीच पाहा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओरेगॉनच्या कोलंबिया नदीमध्ये एक अंगावर शहारे आणणारा अपघात झाला. एक मोठी स्पीड बोट एखाद्या रेल्वेप्रमाणे दुसऱ्या बोटला जाऊन धडकली. या अपघातात फिशिंग करणाऱ्या तिघांनी मृत्यू अगदी जवळून अनुभवला.आतापर्यंत तुम्ही अनेक गंभीर अपघात पाहिले असतील, पण आज आम्ही तुम्हाला पाण्यातील एक असा अपघात दाखवणार आहोत, जे पाहून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. 


कसे घडला अपघात.. 
- कोलंबिया नदीच्या किनाऱ्याजवळ एका बोटमध्ये बसून ब्रायन, क्रिस्टोफर आणि रोनी आरामात मासेमारी करत होते. त्याचवेळी तिघांनी एक मोठ्या आकारातील बोट येताना पाहिली. तिघे उभे राहून ओरडू लागले, पण काहीही फायदा नसल्याचे लक्षात येताच, त्यांना पाण्यात उडी मारण्याशिवाय काहीही पर्याय उरला नाही. 
- बोट एवढी वेगात होती की, तिघांनी पाण्यात उडी मारताच क्षणात ती त्यांच्या बोटला धडकली. त्या लहान बोटचा चुराडा झाला. तिघे जखमीही झाले. 


2 कोटींचा खटला 
- हे प्रकरण गेल्या वर्षीचे आहे पण त्याचा व्हिडिओ आता समोर आल्याचे सांगितले जात आहे. बोटवरील सिक्युरिटी कॅमेऱ्यात ही घटना रेकॉर्ड झाली होती. मिनी बोटचा मालक ब्रायनने त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने धडक मारणऱ्या मार्लिन नावाच्या व्यक्तीच्या विरोधात खटला दाखल करून 372500 डॉलर्स (2 कोटी रुपये) नुकसान भरपाईची मागणी केली आहे. 
- ब्रायनने म्हटले, आम्ही त्यांना थांबवण्याची विनंती केली तेव्हा फोनवर बोलता बोलता तो बोट चालवत होता. तर आरोपी मार्लिनने म्हटले की, तो सीटवर बसून बोट चालवत होता, त्यामुळे त्याला मिनीबोट दिसली नाही. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, कसा झाला हा अपघात.. व्हिडिओ अखेरच्या स्लाइडवर..

बातम्या आणखी आहेत...