आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे बेकायदेशीर आहे वेश्याव्यवसाय, मात्र 10 तरुणींपैकी 7 तरुणी करतात हे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पापुआ न्यू गिनीच्या एका क्लबमध्ये तरुणी...... - Divya Marathi
पापुआ न्यू गिनीच्या एका क्लबमध्ये तरुणी......

जगभरात अनेक असे देश आहेत ज्यांनी आपल्या कायद्यात सेक्स वर्कर्सनासुध्दा हक्क दिला आहे. देहव्यापार सुरळीत करण्याचा प्रयत्नदेखील करण्यात आला आहे. उदाहरण न्यूझीलँड, ऑस्ट्रेलिया, बेल्जिअम, ब्राझील, कॅनाडा, डेन्मार्क, जर्मनी, फ्रान्स ग्रीससह अनेक देशांत विविध कायदे आणि नियम बनवण्यात आले आहेत. मात्र भारतासह काही देशांत देहव्यापाराला बेकायदेशीर मानले जाते. मानवाधिकार करणा-या संस्था वारंवार सेक्स वर्कर्सना हक्क देण्याची मागणी करत आहेत. कारण रेगुलेशनच्या अभावामुळे या पेशातील माहिलांचे आयुष्य वाईट होत चालले आहे.

 

असाच एक देश पापुआ न्यू गिनीमध्ये वेश्या व्यवसाय बेकायदेशीर आहे. तरीदेखील या देशातील मोठ्या संख्येत महिला सेक्स वर्कर्स म्हणून काम करत आहेत. येथील सेक्स वर्कर्सना 'पामुर मेरी' म्हटले जाते. देशात सेक्स वर्कविषयी कोणतीच नियमावली नाहीये. म्हणून या पेशाच्या महिलांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार, देशात दोन तृतियांश तरुणी पैशासाही देहव्यापारात येतात. यामध्ये सामील महिला आणि पुरुष यांना वाईट नजरांचा सामना करावा लागतो.

 

13 टक्के महिला एचआयव्ही/एड्स पीडीत-

 

न्यूज रिपोर्टनुसार, यामधील जवळपास 13 टक्के महिला एचआयव्ही/एड्सने पीडित आहेत. म्हणून इतर लोकांना याची लागण होण्याची दाट शक्यता असते. अनेक महिला आपल्या कुटुंबापासून लपून हा व्यावसाय करतात. यूनायटेड नेशन्सने एकदा सांगितले होते, की देशात 15 ते 24 वर्षांच्या तरुणी शाळा, कॉलेजची फी, खाण्या-पिण्यासाठी आणि हायप्रोफाइल आयुष्य जगण्यासाठी सेक्स वर्कर होतात. इतकेच नव्हे, प्रत्येकी तीनपैकी दोन मुली यात येतात.

स्थानिक सरकार सेक्स वर्कर्सची इतकी संख्या असल्याचे नाकारते. अनेकदा या वेश्या रस्त्यावर ग्राहकांची वाट पाहतात. अनेकदा त्या बार क्लब्स आणि इतर ठिकाणीसुध्दा या दिसतात.

 

70 टक्के सेक्स वर्कर्ससोबत झालाय बलात्कार: USAID

 

अनेकदा अशा महिलांचा डॉक्टर्स आणि नर्ससुध्दा उपचार करण्यास नकार देतात. यूनायटेज स्टेट्स एजेन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपेंट (यूएसएड)ने 2010च्या एका सर्व्हेमध्ये सांगितले होते, की 80 टक्के सेक्स वर्कर्सना लैंगिक शोषणाचा सामना करावा लागतो. सर्व्हेनुसार, जवळपास 70 टक्के महिला बलात्काराच्या शिकार होतात आणि अर्ध्या महिलांवर वारंवार बलात्कार केला जातो.
यूएसएडनुसार, महिलांवर बलात्कार करणा-यांमध्ये 63 टक्के ग्राहकच असतात, तसेच तरुणींचे बॉयफ्रेंड आणि महिलांचे पतीदेखील यात सामील असतात. महिलांच्या पतीने आणि नातेवाईकांनी त्यांना मारहाण केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा सेक्स वर्कर्सचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...