आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावेस्ट आफ्रिकाच्या टेनरिफ आयलंडमध्ये राहणारी एक महिला सध्या इंटरनेस सेंसेशन बनली आहे. अँजेला क्रिकमोरे हिचे फिटनेस असे आहे की, तिचे वय नेमके किती असेल याचा अंदाजच येत नाही. लोक तर तिला कॉलेज स्टुडंट असेल असेच म्हणतात. पण ज्या लोकांना माहिती आहे तेच सांगू शकतात की, अँजेला पूर्वी कशी दिसायची.
कसे झाले टान्सफॉर्मेशन
दोन मुलांची आई असलेल्या अँजेलाने सांगितले की, तिने तिच्या जेवणाच्या सवयीमध्ये कसा बदल केला. त्याचबरोबर तिने व्यायाम करत अशाप्रकारचे शरीर कमावले. काही वर्षांपूर्वी तिचे वजन 90 किलोपेक्षाही अधिक होते. अँजेला म्हणाली, मी स्वतः कंट्रोल करून वजन 40 किलोवर आणले आहे. आता मी पूर्णपणे बदलले आहे.
नव्या लाईफस्टाइलमुळे मोडले लग्न
- या ट्रान्सफॉर्मेशनचा प्रभाव अँजेलाच्या पर्सनल लाइफवरही पडला. अँजेलाने सांगितले की, सोशल मीडियावर एका फॅनने तिला पर्सनल ट्रेनिंग देण्याची विनंती केली. अँजेला त्यासाठी तयार झाली. 10 दिवस सोबत राहिल्यानंतर दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले. त्यानंतर विवाहित अँजेलाने पहिल्या नवऱ्यालाही सोडले.
- अँजेला म्हणाली, मी जाड होते तेव्हाही तो (पहिला पता) माझ्यावर प्रेम करत होता. पण आता मला नवीन जीवन मिळाले आहे. इन्स्टाग्रामद्वारे अँजेलापर्यंत पोहोचणारा मार्क आता तिचा नवा साथीदार बनला आहे.
सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स
- अँजेलाचा फिटनेस पासून लोक तिचे फॅन बनले आहेत. इन्स्टाग्रामवर तिचे जुने आणि नवे फोटो पाहून लोक आश्चर्यचकित होतात. अँजेला 40 वर्षांची होणार आहे, हे लोकांना पटतच नाही. तिचे सुमारे 1.5 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, अँजेलाचे पूर्वीचे आणि आताचे काही PHOTOS..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.