आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याला म्‍हणतात वर्षातील सर्वात मादक रात्र, रस्‍त्‍यावर अशी हुल्‍लडबाजी करतात लोक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनच्‍या न्‍यूकॅसलमध्‍ये मॅड फ्रायडे साजरा केला जातो. याला वर्षातील सर्वात मादक रात्रदेखील म्‍हटले जाते. क्रिसमसच्‍या 2 दिवसांपूर्वी या रात्रीला साजरे केले जाते. यादरम्‍यान लोक भरपूर दारु पितात. यावेळच्‍या मॅड फ्रायडेमध्‍येदेखील लोकांनी खूप दारु पिली आणि रस्‍त्‍यावर हुल्‍लडबाजी केली. यावेळी पोलिसांना नशेत असलेल्‍या लोकांना सांभाळावे लागले.


पोलिसही असतात तैनात
- या पार्टीसाठी ब्रिटन पोलिसही आधीपासून तयार असतात. मागील वर्षी झालेल्‍या काही अनूचित प्रकारांमुळे या वर्षी पोलिसांची जास्‍त कुमक तैनात करण्‍यात आली होती. विशेष म्‍हणजे या ठिकाणी पोलिसांसोबतच आरोग्‍य तज्ञही तैनात केले जातात. ते लोकांना कमी पिण्‍याबद्दल आवाहन करतात.


रस्‍त्‍यांवरच नाइट आऊट
- यावेळच्‍या पार्टीमध्‍ये युवकांसोबतच ज्‍येष्‍ठ नागरिकही सहभागी झाले होते. रात्री उशीरा रस्‍त्यावर धडपडणा-या लोकांना पोलिसांनी कसेबसे सां‍भाळले. नशेत अनेक रस्‍त्‍यावर पडून जखमी झाले. यामध्‍ये मुलींची संख्‍या जास्‍त होती. कित्‍येक जोडप्‍यांनी तर रस्‍त्‍यावरच नाईट आऊट केले.


वर्षातील सर्वात व्‍यस्‍त दिवस
- मॅड फ्रायडे हा वर्षातील सर्वात व्‍यस्‍त मानला जातो. या दिवशी लोक क्रिसमसची शेवटची तयारी आणि शॉपिंग करतात. त्‍यानंतर रात्री मिळून पार्टी करतात. मागील वर्षी या पार्टीमुळे 300 जणांना रुग्‍णालयात दाखल करावे लागले होते. त्‍यामुळेच या वर्षी मागील वर्षापेक्षा जास्‍त अॅम्‍बुलन्‍स तैनात करण्‍यात आले होते.


पुढील स्‍लाइडवर, मॅड फ्रायडेचे फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...