आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

45 वर्षांपासून भंगारात पडून होती ही कार, आता 4.5 कोटींत खरेदी करण्याची लोकांची तयारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्लोरिडामध्ये एक अशी कार समोर आली आहे, जी 45 वर्षांपासून भंगारात पडून होती. या कारला लोक भंगार समजत होते. पण जेव्हा या कारच्या लिलावाची बातमी समोर आली तेव्हा लोकांना धक्काच बसला. लिलावात या कारवर जवळपास 4.5 कोटींची बोली लागली. त्यानंतर भंगार झालेल्या कारमध्ये नेमके काय आहे हे जाणून घेण्यासाठी लोक आतुर आहेत. 


यामुळे आहे एवढी किंमत.. 
नुकतेच एका ऑक्शन हाऊसने ही कार आतापर्यंतचा सर्वाच चांगला शोध असल्याचे म्हटले होते. ही कार पोर्शे कंपनीने तयार केली होती. 1970 मध्ये तयार करण्यात आलेली ही कार एका सेफ्टी ड्राइव्हनंतर कधीही चालवली गेली नागी. 45 वर्षांपासून ही कार भंगात पडून होती. 1500 GS Carrera Coupe नावाची ही कार सेफ्टी ड्राइव्हमध्येच फेल झाली होती. ब्रेकिंग सिस्टीम फेल झाल्याने या कारचे उत्पादन करण्यात आले नाही. 


एवढी किंमत मिळण्याचे कारण 
ही कार टेस्ट ड्राइव्हमध्ये फेल ठरली असली तरी, पोर्शे कंपनीला हिचा खूप फायदा झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार आज जगभरातील पोर्शेच्या स्पोर्ट्स कार टॉपवर पोहोचण्यासाठी या कारने खूप मदत केली. तया कारच्या डिझाइनमुळेच रेसिंग कारचा नवा काळ पाहायला मिळाला. कार प्रेमिंसाठी हे एक क्लासिक आर्ट आहे. त्यामुळेच लिलावासाठी एवढी किंमत सांगितली जात आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या क्लासिक कारचे आणखी काही फोटोज..

बातम्या आणखी आहेत...