आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिनिटाला एवढी कमाई करतात मुकेश अंबानी, जाणून तुम्हालाही बसेल धक्का

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अब्जाधीश बिझनेसमन मुकेश अंबानी दर मिनिटाला किती पैसा कमावतात याचा अंदाज तुम्ही लावू शकता का? नुकतीच हुरुन ग्‍लोबलने जगातील श्रीमंतांची एक यादी जाहीर केली. या यादीत मुकेश अंबानी 45 बि‍लि‍यन डॉलर (सुमारे 2.92 लाख कोटी रुपयांसह) या यादीत सर्वात श्रीमंत भारतीय ठरले. तसेच जगातील 20 श्रीमंतांमध्ये त्यांचा समावेश झाला. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटे की मुकेश अंबानी दर मिनिटाला 2.35 लाख रुपये कमावतात. ही रक्कम भारतीय व्यक्तीच्या सरासरी वार्षिक कमाईपेक्षा खूप जास्त आहे. 


अशी मोजली कमाई.. 
- एका आकडेवारीनुसार 2015-2016 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजची कमाई 27,630 कोटी झाली होती. कंपनीत प्रमोटर म्हणून मुकेश अंबानींची भागीदारी 44.7% आहे. त्यानुसार त्यांच्या वाट्याला येतात 12,351 कोटी रुपये. त्यामुळे दर महिन्याची कमाई काढली तर ती होते, 1029 कोटी. म्हणजे आठवड्याची 257 कोटी आणि दिवसाची कमाई होते, 34 कोटी. 
- याची आकडेवारी काढली तर एका तासाची कमाई 1.4 कोटी आणि मिनिटाची कमाई होते 2.35 लाख रूपये. 
- 2015-2016 च्या आर्थिक आकडेवारीवरून ही माहिती मिळवली आहे. अंबानी एवढीच कमाई करत असतील असा दावा आम्ही करत नाही. 


भारतात नवे 56 अब्जाधीश 
हुरुन ग्‍लोबलने जारी केलेल्या रि‍च लि‍स्‍टमध्ये भारतात 2017 मध्ये 56 नवीन अब्जाधीश असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भारतातील अब्जाधीशांची संख्या 131 झाली आहे. 


पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, अंबानींकडे आहे जगातील सर्वात महागडे खासगी विमान..


 

बातम्या आणखी आहेत...