आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जंगलाच्या मध्यभागी असलेली ही झोपडी आहे असे वाटले, आतून पाहा काय काय निघाले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅलिफोर्नियाच्या अर्काटा जंगलामध्ये लोकांसाठी एक झोपडी चर्चेचा विषय बनली आहे. येथील रेंजरला असे काही तरी आढळले ज्याची त्याने कधी कल्पनाही केलेली नसेल. वर्षानुवर्षे जंगलात राहून काम करणारे रेंजर मार्क आंद्रे एक दिवस कापल्या जाणाऱ्या झाडांवर खुणा करण्यासाठी जंगलामध्ये पोहोचला होता. त्यावेळी त्याला एक झोपडी दिसली ती पाहून तो आश्चर्यचकितच झाला. 


रेंजरने नेमके असे काय पाहिले.. 
- आंद्रेला जंगलात झोपडी पाहून खरेच वाटले नाही. त्याचे कारण म्हणजे तो काही दिवसांपूर्वी जंगलात आला होता. पण त्यावेळी त्याला ही झोपडी दिसली नव्हती. मग एवढ्या कमी दिवसांत कोणी झोपडी बनवली असे त्यांना वाटले. 


आत पाहिले तर धक्काच बसला 
रेंजरने या झोपडीच्या आत जाऊन पाहिले तर त्याला धक्काच बसला. कारण आत एखाद्या घरासारख्या सर्व सुविधा होत्या. पण अशा निर्जन स्थळी कोणी का राहील अशा विचार त्याला आला. त्याने आणखी शोध घेतला तर आत अनेक महिने राहता येईल एवढे सामान होते. खाण्या पिण्याचे पदार्थ, मसाले बेड, सोफा, टाइपरायटर अशा सर्व वस्तू होत्या. 


सनकी राहत असावा.. 
रेंजरने सोशल मीडियात एका पोस्टमध्ये म्हटले की, काही वस्तू पाहून येथे एखादा सनकी स्वभावाचा व्यक्ती राहत असेल असे वाटते. कारण त्या घरात काही खुणा तशा आढळल्या. बाहेरून झोपडीसारखे दिसणारे हे घर काँक्रिटचे तयार करण्यात आले होते. भिंती मजबूत लाकाड्या होत्या. पण जंगलात कोणाला दिसणार नाही, अशा पद्धतीने ती तयार करण्यात आली होती. 


पुन्हा गायब झाली झोपडी... 
रेंजरने या झोपडीमध्ये एक नोटिस सोडली. त्यात झोपडी तयार करणाऱ्यासाठी एक संदेशही लिहून ठेवण्यात आला होता. सार्वजनिक मालमत्तेवर अशाप्रकारे कब्जा करणे बेकायदेशीर आहे, असे त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेले होते. तसेच घर काढण्याचे आदेशही दिलेली होती. काही दिवसांनी जेव्हा रेंजर आपल्या टीमबरोबर परत आला तेव्हा ते घर बेपत्ता झाले होते. रेंजरने म्हटले की, अगदी सराईतपणे हे काम करण्यात आले. पूर्वी तेथे काही होते, असे वाटलेही नाही असे ते म्हणाले. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, या गूढ झोपडीचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...