आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेच्या जॉर्जिया येथे राहाणारी सूजी लार्सन या मुलीने आपले न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर करुन सर्वांनाच धक्का दिला आहे. सूजी 13 वर्षांची होती तेव्हा लैंगिक शोषणाची शिकार ठरली होती. त्यानंतर दोन जणांनी तिच्यावर रेप केला होता. या घटनांनंतर सूजी स्वतःला यातना देऊ लागली. स्वतःच्या शरीराबद्दल तिला घृणा निर्माण झाली. त्यासोबतच आत्महत्येचाही विचार अनेकदा तिच्या मनात आला. काही दिवसांपूर्वी सूजीने स्वतःचे न्यूड फोटोज सोशल मीडियावर अपलोड केले. तसे करण्यामागचे कारणही तिने सांगितले.
अखेर काय झाले होते सूजीसोबत...
- सूजीने सांगितले, की ती 13 वर्षांची होती तेव्हा कुटुंबातीलच एका सदस्याने तिचे लैंगिक शोषण केले होते. आता सूजी 25 वर्षांची आहे. या दरम्यानच्या काळात तिने या काळ्या दिवसांतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. हे फार कठीण होते, असे सूजी म्हणाली.
- तिने सांगितले, तो आमच्या कुटुंबातील सदस्य होता. तो मला नको तिथे स्पर्ष करायचा. माझ्या शरीराबद्दल बोलत राहायचा. मी खूप घाबरलेली होते. त्याने माझ्यावर बलात्काराचाही प्रयत्न केला होता. पण मी हे सर्व घरी सांगू शकत नव्हते. मला घर दुभंगण्याची भीती वाटत होती. असे वाटायचे की माझेच काही चुकत असेल.
एका वर्षांनी झाला बलात्कार
- सूजने पुढे सांगितले, की या घटनेनंतर एका वर्षानी दोन जणांनी रेप केला. मी घरी निघाले होते तेव्हा दोन जणांनी मला ट्रकमध्ये टाकले आणि तिथेच रेप केला.
- सूजी म्हणाली, या घटनांनंतर मला स्वतःचीच घृणा वाटायला लागली होती. मी माझ्या शरीराचा द्वेष करायला लागले होते. यातून स्वतःला इजा करुन घेणे सुरु झाले. मी डिप्रेशनमध्ये गेले होते.
- या काळात माझ्या कुटुंबाने मला सावरले. त्यांनी मला सर्व भूतकाळ विसरण्यास सांगितले. परंतू ते शक्य होत नव्हते.
लग्नानंतर बदलले आयुष्य
- 2014 मध्ये सूजीचे सॅम्यूलसोबत लग्न झाले. लग्नानंतर सूजी डिप्रेशनमधून बाहेर आली. यासाठी तिच्या पतीची तिला फार मदत झाली.
काय टाकले न्यूड फोटो
- इन्स्टाग्राम अकाऊंटवर न्यूड फोटो टाकण्याबद्दल सूजीला विचारले असता ती म्हणाली, आता मी स्वतःवर आणि माझ्या शरीरावर प्रेम करु लागले आहे. हा मी माझ्या रिकव्हरीचा विजय मानते. आणि तोच मी सेलिब्रेट केला.
- माझ्यासारख्या इतर महिलांनाही मला सांगायचे आहे की आत्महत्येसारख्या विचारांना आपल्यावर वरचढ होऊ देऊ नका. यापेक्षा जगाशी लढा द्या.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सुजीचे फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.