आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • ओठ सुजल्यावर इन्फेक्शन समजून दुर्लक्ष करत होती महिला, डॉक्टरांनी तपासल्यावर बसला धक्का Doctors Remove Live Worm Crawling Under Woman's Lips, Previously She Thought It Is Only A Infection

ओठ सुजल्यावर इन्फेक्शन समजून दुर्लक्ष करत होती महिला, डॉक्टरांनी तपासल्यावर बसला धक्का

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशिया - मॉस्कोमध्ये एका महिला ओठांवर आणि चेहऱ्यावर आलेली सूज इन्फेक्शनमुळे आल्याचे समजत होती, परंतु जेव्हा डॉक्टरांनी तिची तपासणी केली, तेव्हा धक्कादायक माहिती उजेडात आली. महिलेच्या चेहऱ्यामध्ये एका मोठा पॅरासाइट वॉर्म (धाग्यासारखी अळी) तयार झाली होती, जी ओठांपासून ते चेहऱ्याच्या इतर भागात सरपटत होती. 

 

डॉक्टरांनी सांगितले यामागचे कारण...
- न्यू जर्नल ऑफ मेडिसनमध्ये छापलेल्या रिपोर्टनुसार, 32 वर्षीय या महिलेचे ओठ खूप सुजले होते. चेहऱ्यामध्ये खाज आणि जळजळ होऊ लागली होती. महिला म्हणाली की, पूर्वी ही सूज तिच्या डाव्या डोळ्यांच्या खाली होती, जो सरकत तिच्या ओठांच्या वरच्या भागापर्यंत आली. यानंतर महिलेने डॉक्टरांकडे धाव घेतली. तिने सांगितले की, काही महिन्यांपूर्वी ती सुट्या घालवायला बाहेर गेली होती, तेथे तिला मच्छर चावले होते. डॉक्टरांनी तत्काळ हा आजार ओळखला. त्यांनी सांगितले की, पॅरासाइट वॉर्मने चेहऱ्याच्या आतच जन्म घेतला आहे. 
- डॉक्टर्स म्हणाले की, जी अळी महिलेच्या आत आहे ती मच्छर आणि कुत्र्यांच्या संपर्कात आल्याने माणसांमध्ये पसरते. ही धाग्यासारखी दिसते आणि 2 वर्षांपर्यँत मानवाच्या शरीरात जिवंत राहू शकते. सुदैवाने सुरुवातीच्या दिवसांत ही अळी मानवासाठी घातक नसते.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...