आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DON'T TRY THIS AT HOME! या तरुणाने त्याच्या मित्रांसोबत जे केले, ते कधीही तुम्ही करणार नाहीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


रशियातील यूट्यूब ब्लॉगर Khizri Zapirov त्याच्या थरारक स्टंटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ब्लॉगरने हा स्टंट स्वतःवर नव्हे तर त्याच्या मित्रांसोबत केला आहे. हा स्टंट मजेशीर आहे, पण यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. झाले असे, की खिजरीने त्याच्या झोपलेल्या मित्रांच्या अंगावर अजगर, मगर आणि इतकेच नाही तर सिंह सोडला होता. त्यानंतर त्याच्या मित्रांची झालेली अवस्था बघण्यासारखी होती.

 

जेव्हा जवळ आला सिंह...
-  या व्हिडिओत खिजरी त्याच्या झोपी गेलेल्या मित्रांच्या अंगावर हे प्राणी सोडताना दिसतोय. एकाच्या अंगावर त्याने अजगर तर दुस-या एका मित्राच्या अंगावर मगर सोडली. इतकेच नाही तर त्याने एका सिंहाला मित्राच्या पंगलावर झोपवले.

- मित्रांची झोप उघडताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. 

सोशल मीडियावर येत आहेत अशा प्रतिक्रिया..
- खिजरीच्या या स्टंटविषयी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही लोकांना हा स्टंट मजेशीर वाटला, तर काहींनी त्याच्यावर टीका केली. 


जीवावर बेतू शकतो असा स्टंट..
- एनिमल एक्सपर्ट्सनुसार, व्हिडिओत दिसणारे तिन्ही प्राणी भयावह आहेत. एका छोट्याशा चुकीमुळे लोकांचा जीव जाऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, सिंहाला ट्रेनिंग दिली गेली असली, तरी तो त्याचा मुळ स्वभाव कधीच विसरत नाही. सिंह माणसांवर कधीही हल्ला करु शकतो. 


पुढील स्लाईड्सवर बघा, संबंधित फोटोज..  

बातम्या आणखी आहेत...