आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई.. कुठे होतीस तू? 7 वर्षानंतर परतलेल्या \'आईला\' मुक्या जनावरांची आर्त हाक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हटके डेस्क: आई तू कुठे होतीस..आता सोडून तर नाही जाणार ना? हे दोन सिंह एका महिलेला लिपटून असेच काहीसे म्हणत असतील. जसे अनेक वर्षानंतर भेटलेल्या आपल्या आईला मुल पकडून प्रेम करते त्याचप्रमाणे हे दोन सिंहही आपल्या आईला असे चाटताना दिसले. ती त्यांची खरी आई नव्हे तर आहे एक महिला. या महिलेने केला होता दोघांचा सांभाळ...

 

7 वर्षानंतर महिला पोहोचली होती झूमध्ये..
हा व्हिडिओ एका स्वीस महिलेचा आहे जिने हे सिंह लहान असताना त्यांचा सांभाळ केला होता. या बछड्यांचा तिने एका आईप्रमाणे सांभाळ केला होता पण जेव्हा ते मोठे झाल्यानंतर त्यांना जागा कमी पडू लागली तेव्हा त्या महिलेने त्यांना जवळच्या प्राणी संग्रहालयात ठेवले. त्या दोन सिंहाना स्वतःपासून वेगळे करणे त्या महिलेसाठी फार दुःखद होते. एक दिवस जेव्हा ती महिला त्यांना भेटायला प्राणीसंग्रहालयात गेली तेव्हा ते दोघे पळत पळत तिच्याजवळ आले आणि तिला बिलगू लागले. त्यांचे ते प्रेम पाहून तिथे उपस्थित असलेला प्रत्येकजण इमोशनल झाला.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, video 

बातम्या आणखी आहेत...