आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्‍त्‍यावरच असे गारठले प्राणी, कझाखस्‍तानचा पारा -56 अंशापर्यंत घसरला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्‍या जगभरातील विविध भागात जीवघेणी थंडी पडली आहे. याचा प्रभाव मानवच नाही तर प्राण्‍यांवरही झालेला आहे. नुकताच कझाखस्‍तानमधून असा व्हिडिओ समोर आला, ज्‍यामुळे सर्वांनाच धक्‍का बसला. येथे एका भागात तापमान -56 अंशापर्यंत खाली गेले आहे. यामुळे बाहेरील प्राण्‍यांचा गोरठून मृत्‍यू झाला आहे.


- नुकताच एका सामाजिक कार्यकर्त्‍याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्‍ये एक कुत्रा व ससा सुरक्षित जागेवर जाण्‍याच्‍या प्रयत्‍नात जागेवरच गोरठून मृत्‍यू पावलेले दिसत आहेत.
- या ग्रुपने सांगितले आहे की, अशा थंडीत प्राणी स्‍वत:चा बचाव करण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत. आम्‍ही संध्‍याकाळीच अशा प्राण्‍यांच्‍या शोधात बाहेर निघतो. जे अश अवस्थेत अडकेलेले आम्‍हाला आढळतात, त्‍यांना आम्‍ही तात्‍काळ गरम जागेवर नेतो आणि त्‍यांच्‍यावर प्राथमिक उपचार करतो.

 

सर्वात थंड जागेत पारा -62 अंशावर
- रशियातील ओम्‍याकॉन भागात मागील आठवड्यात पारा -62 अंशापर्यंत खाली आला आहे. सध्‍या पृथ्‍वीवरील ही सर्वात थंड जागा मानली जाते. हिवाळ्यात येथे सरासरी तापमान -50 डिग्री असते. तरीदेखील या ठिकाणी 500च्‍या आसपास लोक राहतात.


घोड्याचे मांस खातात येथील लोक
- एवढ्या थंडीत जिवंत राहण्‍यासाठी येथील लोक केवळ मांस खातात. तेही घोड्याचे किंवा रेंडीयरचे.


तरीही सुरु राहतात शाळा
- या भागात मुलांसाठी एक शाळादेखील आहे. जोपर्यंत तापमान -52 अंशाच्‍या खाली जात नाही तोपर्यंत या शाळा सुरुच राहतात. थंडीमुळे येथे पेनातील शाईपासून ते पाण्‍यापर्यंत सर्व काही गोठून जाते.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, थंडीमुळे प्राण्‍यांचे असे झाले हाल...


 

बातम्या आणखी आहेत...