आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mystery Unresolved 2000 Old Coffin Lid Opened And Changed The Direction Of Investigation,

शेवटी उघडले 2000 वर्ष जुने ताबूत, क्रेनच्या मदतीने काढले 15 हजार किलोचे झाकण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैज्ञानिकांच्या एका समूहाने सर्व अफवा खोट्या ठरवत आत्तापर्यंतचे सर्वात मोठे ताबूत शोधून काढले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला उत्तर मिस्रच्या अॅलक्झेंड्रिया शहरात दोन हजार वर्षांपूर्वीचे 9 फुट लांबीचे रहस्यमयी ताबूत आढळून आले होते. यामध्ये 'अॅलक्झेंडर द ग्रेट' यांचे अवशेष असल्याचे मानले जात होते. परंतु अॅलक्झेंडर ज्याने या शहराचा (अॅलक्झेनड्रिया)चा शोध लावला, त्या ताबूतमध्ये एकत्र तीन कवट्या आणि अवशेष आढळून आल्यामुळे पुरातत्त्व विभागासाठी हे एक रहस्य बनून समोर आले आहे. हे ताबूत एवढे जड होते की, उघडण्यासाठी एका क्रेनची मदत घ्यावी लागली.


झाली नाही अंधकार जगाची सुरुवात...
इजिप्तच्या पुरातत्त्व मंत्रालयाकडून मुस्तफा वजीरी यांनी सर्व अफवांवर चिमटा काढत सांगितले की, 'आम्ही ताबूत उघडले आणि पाहा कोणत्याही अंधकार जगाची सुरवात झाली नाही, कोणताही शाप आम्हाला लागला नाही. वजीरी यांनी सांगितले की सर्वात पहिले मीच या ताबूतमध्ये डोकावून पाहिले. यामध्ये आढळून आलेले ममी राजघराण्यातील नाहीत. कारण यामध्ये कोणत्याही प्रकारचे सोन्या-चांदीचे दागिने किंवा अशी कोणताही वस्तू आढळून आली नाही, जी शाही लोकांना दफन करताना ठेवली जाते.


तर मग कोणाचे आहेत हे अवशेष
पुरातत्व विभागाने सांगितले की, हे तिन्ही ममी सैनिकांचे आहेत. यामधील एका ममीला बाण लागल्याची खूण आहे. क्रेनच्या मदतीने हे ममी काढून इजिप्तच्या नॅशनल रिस्टोरेशन म्युझियममध्ये ठेवले जातील आणि येथेच यांच्या मृत्यूचे कारण आणि इतर गोष्टींचा अभ्यास केला जाईल.


ताबूत उघडल्यास येणार कयामत 
ताबूत उघडणार असल्याची बातमी येताच अफवांनी सर्वत्र भीती पसरवली होती. लोक स्वतःच्या मनानुसार दवे करत होते, ताबूत उघडतात कयामत येणार, शाप लागणार. आणखी एका दावा एखाद्या चित्रपटाच्या कथेनुसार होता आणि यावर इजिप्तच्या लोकांनी बराच विश्वास ठेवला होता. दाव्यानुसार ताबूत उघडताच संपूर्ण जग हजारो वर्षांसाठी अंधारात जाईल. अंधकार जगाची पुन्हा सुरुवात होईल.


एकूण वजन 30 हजार किलो, 15 हजार किलोचे झाकण 
- वैज्ञानिकांनी सांगितले की, ताबूत उघडणे वाटले तेवढे सहजसोपे काम नव्हते. हे जमिनीच्या 18 फूट खाली होते. याची लांबी 9 फूट आणि वजन 30 हजार किलो होते. ताबूत काळ्या ग्रॅनाईट दगडापासून बनवलेले होते. 

बातम्या आणखी आहेत...