आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेला वाटले जुळे असतील; डिलिव्हरीच्या दिवशी Shock झाले डॉक्टर, बोलावली 15 जणांची टीम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेक्सास -  अमेरिकेत राहणाऱ्या लॉरा पर्किन्स या महिलेच्या डिलिव्हरी दरम्यान डॉक्टर सुद्धा हैराण झाले. लौरा जेव्हा गर्भवती झाली तेव्हा तिचे पोट सामान्य गर्भवती महिलांच्या तुलनेत अधिक मोठे होते. तिला आपल्या पोटात जुळे असतील असे वाटले होते. पोटात कळ आल्यानंतर डॉक्टरांनी सोनोग्राफीचा सल्ला दिला. सोनोग्राफी करताना डॉक्टरसह पति-पत्नीला धक्काच बसला. तिच्या पोटात एक-दोन नव्हे, तर तब्बल 6 भ्रूण असल्याचे समोर आले. सरासरी 36 महिन्यांत बाळाचा जन्म होतो. परंतु, लॉराच्या गर्भधारणेला 30 आठवडेच झाले होते आणि डिलिव्हरीचा निर्णय घ्यावा लागला. सिझेरियन पद्धतीने डॉक्टरांनी केलेल्या डिलिव्हरीत 3 मुली आणि 3 मुले जन्माला आली आहेत. ही घटना 2012 मध्ये घडली. आता या महिलेने आपली स्टोरी शेअर केली आहे.


40 लाखांतील एक प्रकरण...
डॉक्टरांना वेळीच लक्षात आले होते, की ही डिलिव्हरी नॉर्मल नाही. 6 बाळांच्या डिलिव्हरीसाठी त्यांनी 15 जणांची विशेष टीम तयार केली. यानंतर 35 मिनिटे चाललेल्या शस्त्रक्रियेत 3 मुले आणि 3 मुलींचा जन्म झाला. यापैकी एका मुलीची आरोग्य व्यवस्थित नाही. त्यामुळे, डॉक्टरांनी तिला लाइफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवले आहे. एकाच महिलेने इतक्या मोठ्या संख्येत एकाचवेळी जन्म देण्याची घटना अतिशय दुर्मिळ आहे. 40 लाख गर्भवती महिलांपैकी एक महिलेवर अशी परिस्थिती येऊ शकते. त्यातही सगळेच सुखरूप राहतील याची शाश्वती नसते. लॉराने 6 बाळांना जन्म दिला आहे. त्यापैकी एकावर उपचार सुरू असले तरीही मेडिकल सायन्समध्ये हा एक चमत्कार आहे असे डॉक्टरांनी म्हटले आहे. 


ब्रिटिश महिलेनेही दिले होते 6 बाळांना जन्म
2010 मध्ये सुद्धा ब्रिटनच्या एका महिलेने एकाचवेळी 6 बाळांना जन्म दिला होता. डॉक्टर आणि नर्सच्या मोठ्या टीमने 31 वर्षीय महिलेची नियोजित वेळेच्या 14 आठवड्यांपूर्वीच डिलिव्हरी केली होती. अधिकृत आकडेवारी पहिल्यास ब्रिटनमध्येच सर्वप्रथम 1983 मध्ये अशा प्रकरणाची नोंद झाली होती. त्यावेळी लिव्हरपूल येथे एका महिलेने एकाचवेळी 6 बाळांना जन्म दिला होता. त्या सगळ्याच मुली होत्या.


पुढील स्लाइड्सवर पाहा, फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...