आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा सपना चौधरीच्या गाण्यावर थिरकतो रणवीर सिंह, व्हायरल झाला Video

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता रणवीर सिंहला तुम्ही कधी सपना चौधरीच्या गाण्यांवर थिरकताना बघितले आहे का? जर नाही, तर मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. या व्हिडिओत रणवीर सिंह चक्क सपनाच्या गाण्यावर ठेका धरताना दिसतोय. हा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहे, पण त्यामागचे सत्य म्हणजे हा व्हिडिओ काही नेटकरांनी तयार केला आहे.  झाले असे, की सपनाच्या चाहत्यांनी पद्मावत या चित्रपटातील रणवीर सिंहवर चित्रीत झालेल्या 'खलबली...' या गाण्याच्या बॅकग्राऊंडला सपना चौधरीचे गाणे लावून ते एडिट केले आहे. 


झपाट्याने व्हायरल होत आहे व्हिडिओ.. 
'पद्मावत' या चित्रपटात रणवीर सिंहने अलाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारली आहे. यामध्ये खलबली या गाण्यावर रणवीरने धमाकेदार डान्स केला आहे. व्हिडिओत सपना चौधरीचे गाण्यावर रणवीरला थिरकताना बघणे मजेशीर असून लोक व्हिडिओ पसंत करत आहेत.
 

बातम्या आणखी आहेत...