आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Mysterious Child Sacrifice : Archaeologists Foun Mortal Remains Of Children Sacrificed Ritually

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलांचा बळी दिल्याचा इतिहासात भेटला सर्वात मोठा पुरावा, शेकडोंचे हृदय काढले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेरुमध्ये आर्कियोलॉजिस्टच्या टीमने एक संशोधन केले आहे. पेरुच्या उत्तर तटावर खोदकामा करताना रिसर्च टीमला जवळपास 140 मुलं आणि 200 लामा(एक प्रकारचा प्राणी) चे अवशेष मिळाले आहेत. मुलांच्या सर्व अवशेषांमध्ये छातीवर मोठे छिद्र आढळले आहे. वैज्ञानिक म्हणतात की, यांच्या फासळ्या तोडून यांचे हृदय बाहेर काढण्यात आले होते. हा एखाद्या धार्मिक पध्दतीचा बळी होता. टीमने याला मानवी इतिहासातील सर्वात मोठा बळी म्हटले आहे. 


2011 मध्ये मिळाले होते सापळे
- सर्वात पहिले 2011 मध्ये आजुबाजूला राहणा-या लोकांना मानवाचे आणि प्राण्यांचे अनेक सापळे मिळाले होते. यानंतर एक्सपर्टने येथे खोदकाम करण्याचा निर्णय घेतला. पुढच्या काही वर्षांमध्ये येथून निघणा-या सापळ्यांचे प्रमाण वाढत गेले.

 

कापली होती छाती 
- अवशेषांवर संशोधन केल्यानंतर एक्सपर्ट्सला विश्वास बसला की, या मुलांचा एकाच वेळी बळी देण्यात आला होता. यांची छाती कापून हृदय बाहेर काढण्यात आले होते.


550 वर्षांपुर्वी दिला होता बळी
- या सापळ्यांची रेडियोकार्बन डेटिंग करण्यात आल्यानंतर कळाले की, हे मुलं जवळपास 550 वर्षांपुर्वी मारण्यात आले होते. यामध्ये मुलं आणि मुली दोघांचेही सापळे होते. ज्यांचे वय 8 ते 12 वर्षे होते. यामध्ये सर्वात लहान एक मुलगा 5 वर्षांचा होता.


एजटेकमध्येही देण्यात आले होते असे बळी
- टेनोशटिटलची राजधानी एजटेकमध्ये मुलांचा बळी देण्यात आला होता. हा बळी सर्वात मोठा मानला जातो. येथे 42 मुलांचा बळी देण्यात आला होता.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा खोदकामात निघालेलेल अवशेष...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...