आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढच्या महिन्यात भारतात सुरू होऊ शकते 'बिकिनी एअरलाइन्स', महिला सीईओची आइडिया

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खबरें जरा हटके - पुढच्या महिन्यापासून भारतात फ्लाइट्समध्ये एअरहोस्टेस बिकिनी परिधान केलेल्या दिसतील. व्हिएतनामची ViertJet कंपनी त्याची अनोखी 'बिकिनी एअरलाइन्स' भारतात सुरू करत आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, त्यांच्या फ्लाइट्स नवी दिल्ली ते Chi Minh City दरम्यान असतील. यात एअरहोस्टेसचा ड्रेसकोड बिकिनी असेल. 


या एअरलाइन्सच्या फ्लाइट्स आठवड्यातून चार दिवस उड्डाण करतील. ही एअरलाईन सेक्स्टि मार्केटिंग पद्धतीसाठी ओळखली जाते. वुमन आंत्रप्रिन्योर Nguyen Thi Phuong Thao ही एअरलाइन चालवते. बिकिनी एअरलाइनची आयडियाही त्यांचीच आहे. 


का ठेवला बिकिनीचा ड्रेसकोड 
कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर Luu Duc Khanh म्हणाले, आम्ही नेहमी एअरहोस्टेसचे ड्रेसकोड बजलत असतो. लोकांना जे परिधान करायचे असेल त्याचे त्यांना स्वातंत्र्य आहे. त्याला सेक्स्टि मार्केटिंग म्हटले तरी हरकत नाही. आमची 'बिकिनी इमेज' तयार झाली तरीही चालेल. आमचे प्रवासी हा ड्रेस कोड्स पाहून आनंदी होतात यातच आम्हाला आनंद आहे. 


पाहता-पाहता टॉपवर पोहोचली कंपनी 
कंपनीच्या प्रेसिडेंट आणि सीईओ Nguyen Thi Phuong Thao यांनी 2011 मध्ये या एअरलाईनची सुरुवात केली होती. काही काळातच ही कंपनी व्हिएतनामची दुसऱ्या क्रमांकाची एअरलाईन कंपनी बनली. त्यामुळे या कंपनीची ओनरही व्हिएतनामची पहिली महिला अब्जाधीश बनली. या एअरलाईनच्या 23 डोमेस्टीक आणि 10 इंटरनॅशनल फ्लाइट्स आहेत. भारतात लोक या बिकिनी एअरलाइन्सला कसा प्रतिसाद देतात हेही आता लवकरच कळेल. 

 

 

बातम्या आणखी आहेत...