आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामँचेस्टरमध्ये राहणारा 36 वर्षीय बॉडी बिल्डर Blake Beckford ने नुकतेच त्याच्या संघर्षमय जीवनाबद्दल सर्वांना सांगितले आहे. ब्लेक अनेक दिवसांपासून एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. त्यामुळे त्याच्या शरिरातून घाण बाहेर पडत नाही. त्यामुळे डॉक्टर्सने त्याच्या पोटावर एक पिशवी लावली आहे. पण काही दिवसांपूर्वी त्याला यामुळे अपमानही सहन करावा लागला होता.
या आजाराने ग्रस्त..
- ब्लेकने एका न्यूज चॅनलला सांगितले की, काही दिवसांपूर्वी त्याच्याबरोबर एक अशी घटना घडली त्यामुळे तो नैराश्यात गेला होता. काही दिवसांपूर्वी एका इव्हेंटमध्ये ब्लेकला टॉयलेटला जायचे होते. त्याचे कारण म्हणजे त्याच्या कमरेजवळ लावलेली पिशवी फूल होऊन लीक व्हायला लागली होती. पण त्याला जे उत्तर मिळाले ते ऐकूण त्याला धक्का बसला होता.
- ब्लेक म्हणाले, मी रिसेप्शनिस्टजवळ पोहोचलो आणि त्याठिकाणी टॉयलेटबद्दल विचारणा केली. पण मला त्यांनी स्पष्ट नकार दिला. ब्लेकने त्याच्या शरिरावर लावलेली पिशवीही दाखवली. ती लीक होत असून रिकामी करायची हेही सांगितले, पण टॉयलेट सामान्य लोकांच्या वापरासाठी नाही असे मला सांगण्यात आले.
शो सोडून गेला टॉयलेट शोधण्यासाठी
ब्लेकने सांगितले की, हा सर्व प्रकार फार अपमानजनक होता. त्यानंतर मला त्याच अवस्थेत दुसऱ्याठिकाणी टॉयलेट शोधण्यासाठी जावे लागले. बॅग सर्वांसमोर लीक व्हायला नको ही भितीही त्याला होती. कारण त्याने त्याचा सर्वांसमोर अपमान झाला असता.
यामुळे आहे त्रास
ब्लेकने सांगितले की, त्याला तीन वर्षांपूर्वी ulcerative colitis नावाचा दुर्मिळ आजार झाला होता. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी त्याच्या आतड्याच्या आधी एक बॅग कनेक्ट केली, त्यात शरिरातील घाण जमा होते.
पुढे पाहा, या बॉडी बिल्डरचे काही PHOTOS
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.