आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहानपणी तलावात दिसले होते बुडबुडे, 50 वर्षांनंतर तलावातून निघाली ही वस्तू की सर्वच झाले आश्चर्यचकीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लहानपणीची एक लहानशी आठवणही अनेकदा लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत असते. 1944 मध्ये युरोपच्या अॅस्टोनियामध्ये राहणाऱ्या एका लहानशा मुलाने घराजवळच्या एका तलावात काही बुडबुडे निघत असल्याचे पाहिले होते. त्यावेळी त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. पण या घटनेच्या 50 वर्षांनंतर त्याला ती बाब आठवली आणि त्याने त्याठिकाणी एक खास बाब शोधली.

 

लहानपणीची स्टोरी केली होती शेयर..

या मुलाने लहानपणी अॅस्टोनियाच्या कुर्तना मटास्जर्व तलावाच्या मध्यभागातून बुडबुडे निघताना दिसले. त्या घटनेने त्याच्या मनावर खोलवर छाप पडली होती. पण त्याठिकाणी काय आहे हे त्याला कळले नाही. पण त्यानंतर 50 वर्षांनी त्याने त्याच्या सोशल अकाऊंटवर त्याचा फल्लेख केला. त्याची स्टोरीने वॉर हिस्ट्रीचा अभ्यास करणाऱ्या काही जणांचे लक्ष वेधले. इनव्हेस्टीगेशन टीमबरोबर तो व्यक्ती पुन्हा त्या तलावाजवळ पोहोचला. सुमारे आठ तासांनंतर तलावातून असे काही निघाले की, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. तलावाच्या आत वर्ल्ड वॉरचा एक रणगाडा बुडालेला होता. त्याव्यक्तीने जर ती आठवण सहजपणे विसरली असती, तर त्याला ती वस्तू कधीही शोधता आली नसती.

 

एवढ्या तयारीनिशी पोहोचली होती टीम..
इनव्हेस्टीगेशनसाठी टीम संपूर्ण तयारीनिशी त्याठिकाणी पोहोचली होती. त्याने स्टील केबल्सना तलावात सुमारे तीन मीटर खालपर्यंत टाकल्या. टीम एक बुलडोजर घेऊन आली होती. पण टीमला भिती याची होती की, एवढ्या तयारीनंतरही तलावातून काही बाहेर आले नाही तर काय होणार.

 

चिखलातून निघाला रणगाडा..
टीमने सकाळी 9 वाजेपासून पाण्यात शोध घ्यायला सुरुवात केली. आठ तास त्यांच्या हाती काहीही लागले नाही. टीमचा उत्साह कमी होत होता. पण तेवढ्यात त्यांच्या लक्षात आले की, त्यांची मेहनत वाया गेली नाही. चिखलाने भरलेली एक जड वस्तू बाहेर निघाली तर टीमच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांच्या लक्षात आले की, ते वर्ल्ड वॉर 2 मध्ये वापरलेला एक रणगाडा आहे.

 

तेव्हाही काम करत होते इंजिन..
हा युद्ध रणगाडा रशियात तयार करण्यात आला होता. जर्मन आर्मीने त्याचा वापर केला होता. त्याचे वजन 30 टनपेक्षा जास्त होते. पाहेर काढल्यानंतर चेक केल्यानंतर टीमच्या लक्षात आले की, इंजिन अजूनही काम करत आहे. त्यानंतर तो रणगाडा मिलिट्री म्युझियममध्ये ठेवला.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS..

बातम्या आणखी आहेत...