आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफोटोग्राफर जगातील प्रत्येक वस्तू ही सामान्य लोकांचत्या तुलनेत अगदी वेगळ्या नजरेतून पाहत असतात. ब्राझीलचा फोटोग्राफर गुस्तावो गोम्सलाही वेगळ्या नजरेतून जग पाहण्याची सवय आहे. त्यात जेव्हा त्याला त्याच्या गर्लफ्रेंडने तिच्या प्रेग्नंसीबाबत सांगितले तेव्हा त्याने हे क्षण वेगळ्या प्रकारे कॅमेऱ्यात टिपण्याचा निर्णय घेतला.
असे टिपले आनंद अन् वेदनांचे फोटो..
गुस्तावोची गर्लफ्रेंड प्रिस्किलाने त्याला जेव्हा सांगितले की, तो लवकरच पिचा बनणार आहे, तेव्हा या फोटोग्राफरच्या आनंदाला पारावार उरला नाही. बाळाला जन्म देण्याच्या 20 तासपूर्वी त्याने गर्लफ्रेंडचे फोटो क्लिक करण्यास सुरुवात केली. जोपर्यंत तिला कंफरटेबल वाटेल तोपर्यंत फोटो क्लिक करेल असे त्याने प्रिस्किलाला सांगितले. यातासांमध्ये प्रिस्किलाचे लेबर पेन कॅमेऱ्यात कैद केले. प्रिस्किलाने घरीच बाळाला जन्म दिला. वेदना सहन करूनही बाळाच्या जन्मानंतर तिच्या चेहऱ्यावरचे हसू गुस्तावोसाठी आश्चर्यकारक होते.
पोज द्यायला सांगितले तर..
लेबरपेन सहन करणाऱ्या गर्लफ्रेंडला गुस्तावोने आधी पोज द्यायला सांगितले. पण प्रिस्किलाच्या रिअॅक्शननंतर त्याच्या लक्षात आले की, हवे तसे फोटो मिळणार नाही. त्यामुळे त्याने नॅचरल पोटो क्लिक करण्याचा निर्णय घेतला. गुस्तावोने नंतर गर्लफ्रेंडच्या सहमतीने हे इंटेंस मोमेंट्स सोशल साइट्सवरही शेयर केले. लोकांनी सोशल मीडियावर या फोटोंचे कौतुकही केले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, गुस्तावोने क्लिक केलेले काही PHOTOS..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.