आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहटके डेस्क: कधी कुठला प्राणी बिना धडाचे जिवंत राहु शकतो काय असे आपणास कोणी विचारले तरी आपण त्याला मुर्खात काढु. पण असे खरोखर झाले आहे. अमेरिका येथील कोलाराडो येथे ल्योय्ड ओस्लेन पोल्ट्री फॉर्म चालवत असे. 18 सप्टेंबर 1945 रोजी एका पार्टीसाठी त्यांनी एक कोंबडा कापला आणि त्याला बॉक्समध्ये टाकण्याएवजी त्याने बाजुला ठेवले आणि तो कोंबडा तेथून पळून गेला. कोंबड्याने माणसाला बनवले करोडपती...
माईक नावाच्या या कोंबड्याला कापताना असे झाले होते की त्याचे काही महत्तवाच्या नसा आणि कान वाचले होते ज्यामुळे तो श्वास घेऊ शकत होता. कोंबड्याच्या मालकाला त्याची दया आली आणि मग तो त्याला दूध आणि मका खाऊ घालु लागला. पण हा अजुबा लोकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला आणि त्याद्वारे ल्योल्डची चांगलीच कमाई होऊ लागली. या कोंबड्याविषयीचे अनेक इंटरव्ह्यु पब्लिश झाले आणि त्याती किंमत दहा हजार डॉलर लावण्यात आली.
- मार्च 1947 रोजी एका शोमधून परतत असताना ल्योल्ड एका हॉटेलमध्ये थांबला आणि अचानक अर्ध्या रात्री माईकचा जीव गुदमरायला लागला. मक्याचा एक दाणा त्याच्या गळ्यात अडकला होता आणि ल्योल्ड त्याला खाऊ घालण्यासाठी वापरण्यात येणारी सिरींज शोच्या जागीच विसरुन आला. त्यामुळे डोके कापले गेल्यानंतर माईकची दीड वर्षानंतर प्राणज्योत मालवली.
पुढच्या स्लाईडवर पाहा, माईक कोंबड्याचे काही खास Photos..
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.