आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराच्या गार्डनमध्ये झाले लावण्यासाठी उकरत होते माती, मिळाली रत्नांनी भरलेली पेटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्युझीलँड - येथे स्टेलन आईलँड येथे एका कपलला गार्डनबाहेर रत्नांनी भरलेली पेटी मिळाली आहे. येथे राहणारे मॅथ्यू आणि त्यांची पत्नी घरासमोरील गार्डनमध्ये जमीन खोदून झाडे लावत होते त्यावेळी खोदकाम करताना त्यांना एक बॉक्स मिळाला. त्यावेळी त्यांना तो केबल बॉक्स असेल असे वाटले पण त्यात पाहिले   असता त्यात सोन्याचे दागिने त्यांना मिळाले. केवळ सोनेच नाही तर हिरे आणि चांदीही त्यांना त्यात सापडली. या सर्व दागिन्यांची किंमत जवळपास 35 लाख सांगण्यात येत आहे. 

 

आणि मिळाला एक पत्ता..
 हा बॉक्स पाहून हा चोरलेला माल आहे असे मॅथ्यू आणि त्याच्या पत्नीच्या लक्षात आले या बॉक्समध्ये एक पत्ताही त्यांना मिळाला आणि त्यांनी त्या पत्त्यावर पोहोचत पोलिसांनाही कळवले. त्यांनी पत्त्यावर पोहोचल्यावर त्यांना त्यांच्याकडे कधी चोरी झाली होती का असे विचारले यावेळी त्यांनी होकार दिला. यानंतर पोलिसांनी या सर्व सामानाची पुष्टी केली त्यावेळी कळाले की 2011 साली या घरात चोरी झाली होती आणि 52 हजार डॉलर चोरीचा आकडा पोलिसांना सांगण्यात आला होता.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा. काही खास फोटो...

बातम्या आणखी आहेत...