आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मृत्यूचा सापळा\' अशी आहे या किल्ल्याची ओळख, जीव मुठीत घेऊन करावा लागतो सर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील माथेरान आणि पनवेल यांच्या दरम्यान असलेल्या या किल्ल्याची ओळख 'मृत्यूचा सापळा' अशीही आहे. हा किल्ला चढताना जराही चूक झाली तरी जीव गमवावा लागू शकतो. आतापर्यंत याठिकाणी अनेकांनी प्राण गमावले आहेत. त्यामुळेच स्थानिक लोक याला 'मृत्यूचा सापळा' असे म्हणतात. 2300 फूट ऊंच डोंगरावर हा किल्ला आहे. या किल्ल्याच्या पायऱ्या उभी चढण असलेल्या आहेत. त्यावर चढण्यासाठी दोरखंड किंवा रेलिंग काहीही नाही. थेड चोंगर कापूनच किल्ल्यावर चढण्यासाठी पायऱ्या तयार करण्यात आल्या आहेत. पूर्वी या किल्ल्याचे नाव मुरंजन असे होते. पण नंतर शिवाजी महाराजांच्या काळात याचे नाव बदलून महाराणी कलावंतीच्या नावावर म्हणजे कलावंती किल्ला असे ठेवण्यात आले. याकिल्ल्यावर केवळ ऑक्टोबर ते मे दरम्यानच ट्रेकिंग करता येऊ शकते. एवढेच नाही तर सायंकाळी अंधार पडण्यापूर्वी लोक किल्ल्यावरून परत येतात. किल्ल्याचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. 

बातम्या आणखी आहेत...