आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा कारनामा बघून थंडी विसरुन जाल, तरुणींनी उणे 65 डिग्री सेल्सियसवर केले असे काही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे जगातील काही देशांमध्ये थंडीची लाट पसरली आहे. तर दुसरीकडे रशियाच्या साखा रिपब्लिकमधील काही फोटोज समोर आले आहेत, हे फोटोज बघून तुम्ही थंडी विसरुन जाल. साखा रिपब्लिकमधील काही फोटोज झपाट्याने व्हायरल होत आहेत, यामध्ये  तिघे जण उणे 65 डिग्री सेल्सियस तापमानात एका नदीत अंघोळ करताना दिसत आहेत. येथे उपस्थित लोकांनी हा व्हिडिओ तयार करुन सोशल मीडियावर अपलोड केला आहे. 

 

पाण्यात घेतली उडी...  

- रिपोर्ट्सनुसार दो तरुणी आणि एक पुरुष त्यांच्या कारने नदीकाठी पोहोचले. येथील उणे 65 डिग्री सेल्सियस तापमानामुळे संपूर्ण वातावरण गोरठले होते. नदीतसुद्धा बर्फ जमला होता. एवढ्या थंडीत एखादी व्यक्ती अंगावरचे स्वेटर काढण्याचा विचारसुद्धा करणार नाही. पण या तिघांनी अंगावरील सर्व कपडे काढून गारठलेल्या नदीत उडी घेतली.

 

हा स्टंट बेतला असता जीवावर...
- तज्ज्ञांनुसार, एवढ्या थंडीत नदीत अंघोळ करणे या तिघांच्या जीवावर बेतू शकले असते. एवढ्या थंडीत नदी उडी घेणे आत्महत्या करण्यासारखे आहे. तज्ज्ञांच्या मते, एवढ्या थंडीत व्यक्तीला हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते किंवा हाइपोथर्मियामुळेही व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. व्हिडिओत हे तिघे नेमके कोठून आले होते, त्यांची नावे काय आहेत, याची माहिती उघड होऊ शकली नाही.  

 

पुढील स्लाईड्सवर बघा, संबंधित फोटोज..   

बातम्या आणखी आहेत...