आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदी अरबला आता कधीच होणार नाही तेल संपण्याची चिंता, असा मिळाला कधीच न संपणारा खजिना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेल उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या सौदी अरबची नजर आता अशा स्त्रोतावर आहे ज्यामुळे त्याला आता कधीच तेल संपण्याची चिंता होणार नाही. सौदीची सर्व अर्थव्यवस्था तेलावर अवलंबून आहे पण आता त्यांना केवळ तेलावरच अवलंबून राहावे लागणार नाही. येथे लवकरच अशा प्रकारे वीजेची निर्मिती करता येणार आहे जी पद्धत कोणीही विचारात घेतली नसेल. येथे जमिनीतून निघणारे इंफ्रारेड रेडिएशनला वीज बनवण्यासाठी वापरले जाणार आहे. अशी बनवणार वीज..

 

- मिळालेल्या माहितीनुसार, शास्त्रज्ञांनी असे मॉडेल तयार केले आहे की, जे जमिनीतून निघणारे रेडिएंट सर्वात पहिले कलेक्ट करेन रेडीएशन कलेक्ट करण्यासाठी यात काही एंटीना तयार केले जाणार आहेत. एंटीनामधून निघणारे रेडिएशन सेमीकंडक्टर डायोडमध्ये पोहोचतील. डायोड इंफ्रारेडमधून मिळणारे  अलटर्नेटिंग करंटला डायरेक्ट करंटमध्ये बदलण्यात येतील याला खूप मोठ्या स्तरावर करण्याची प्लानिंग केली जात आहे. ज्यामुळे अनेक शहराना वीजपुरवठा होणार आहे. 

 

सोलर एनर्जीचाही वापर करणार सौदी..
- सौदी अरबने त्याच्या या नव्या प्लानवर काम करण्यास सुरुवात केली आहे. येथील ACWA पॉवर नावाच्या कंपनीचा या प्रोजेक्टचे काम देण्यात आले आहे. या कंपनीला रियाद येथे एक सोलर फार्म बनवायचा आहे ज्याचा उद्देश दोन लाख घरांना वीज देणे असे असेल. या प्रोजेक्टमध्ये 300 मिलीयन डॉलरचा खर्च होणार आहे. सांगितले जात आहे की,  यामुळे अनेक लोकांना रोजगारही मिळणार आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, या बातमीसंदर्भातले काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...