आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाडीतील पेट्रोल संपल्यास भोगावा लागू शकतो तुरुंगवास, हे आहेत जगातील विचित्र कायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील अनेक देशांमध्ये त्यांचे काही कायदे असतात. अनेकदा असे कायदेही तयार केले जातात, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण असते. उदाहरण द्यायचे झाले तरक जर्मनीतील कायद्याचेच पाहा. याठिकाणी जर गाडी चालवताना तुमचे पेट्रोल संपले तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. कदाचित तुम्हाला तुरुंगवासही भोगावा लागू शकतो. 


यामुळे बनवण्यात आला कायदा
- जर्मनीच्या ऑटोबन हायवेवर कार चालवताना तुमच्या कारचे पेट्रोल संपले तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. त्याचे कारण म्हणजे पेट्रोल संपल्यास या अत्यंत व्यस्त असलेल्या हायवेवर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता असते. त्यामुळे याठिकाणी जाण्याआधी लोकांना टँक फुल करण्याचा सल्ला दिला जातो. 
- याठिकाणी हायवेवर एक नियम पाळला जातो, येथे गाड्यांचा वेग ताशी 130 ते 150 किमी दरम्यान ठेवणे अनिवार्य असते. 


अंडरवियरने कार स्वच्छ करणे बेकायदेशीर 
अंडरवियरने कार स्वच्छ करणे बेकायदेशीर आहे असे तुम्ही कधी ऐकले आहे का? याचे उत्तर नक्कीच नाही असे असेल. अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये मात्र असा कायदा आहे. जर याठिकाणी एखादा व्यक्ती अंडरविअरने कार साफ करताना आढळला तर तो अपराध समजला जातो. हा नियम 2020 पर्यंत शहर 'झिरो वेस्ट सिटी' व्हावे म्हणून तयार करण्यात आला आहे. 


पुढील स्लाइड्सवर वाचा, जगातील असेच मजेशीर आणि विचित्र कायदे...

 

बातम्या आणखी आहेत...