आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएवढ्या आरामात कमाई करण्याचा विचारही कदाचित कोणी केला नसेल. पण ऑस्ट्रेलियाच्या या गेमर गर्ल्स आपल्या घरातून किंवा कार्यालयातून सोफ्यावर बसल्या बसल्या लाखो-कोट्वधींची कमाई करत आहेत. त्यांचे काम तरी नेमके काय असेल? याचे उत्तर आहे व्हिडीओ गेम खेळणे. अगदी बरोबर. एक तास व्हिडीओ गेम खेळण्याच्या मोबदल्यात त्यांना मोठी रक्कम मिळत असते. लाखो लोक त्यांच्या खेळाचा लाइव्ह व्हिडीओ पाहत असतात. या स्ट्रिमिंगचे सबस्क्रिप्शन, जाहिराती आणि स्पॉन्शरशिप यातून त्यांना पैसा मिळतो.
अशा असतात गेमर गर्ल्स..
- इंटरनेटने कमाईचे अनेक मार्ग दाखवून दिले आहेत. त्यापैकी एक आहे व्हिडीओ लाइव्ह स्ट्रीमिंगचा. म्हणजे लोक तुम्हाला लाइव्ह व्हिडीओमध्ये पाहतात.
- ऑस्ट्रेलियाची चेल्सिया गेमिंग वर्ल्डमध्ये एक्समिंक्स नावाने ओळखली जाते. व्हिडीओ गेम खेळण्याच्या कामातून ती सहा अंकी कमाई करते. म्हणजे 1 लाख ते 9.99 लाखांपर्यंत. तेही डॉलरमध्ये.
- लोक लाइव्ह व्हिडीओमध्ये त्यांना गेम खेळताना पाहतात. त्यावेळी त्या चर्चाही करतात. चेल्सियाचे साडेतीन लाख सबस्क्राइबर आहेत.
- चेल्सियाने फार्मसीमध्ये युनिव्हर्सिटी डिग्री घेतली आहे. पण तिच्या मते लाइव्ह स्ट्रीमिंगमधून होणारी कमाई तिला शिक्षणाचा वापर करून करता आली नसती.
कामात धोकाही..
- कॅथलिनही गेमर गर्ल आहे. ती लूजरफ्रूट नावाने ओळखली जाते. तिच्या मते अनेक पुरुष दर्शकांमुळे तिला त्रास झेलावा लागतो.
- लोक कॅथलिनची खिल्ली उडवतात, तिला शिविगाळ करतात. तिच्याशी अश्लिल भाषेत बोलतात. तसेच प्रत्यक्षात तिचा पाठलागही करतात.
- कॅथलिनला केवळ सबस्क्रिप्शनमधून कमाई होते असे नाही. तिचे अनेक चाहते तिला 5000 डॉलर पर्यंत दानही देतात.
पुढील स्लाइड्सवर पाहा, चेल्सिया आणि कॅथलिनचे काही फोटो..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.