आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमुद्री इतिहासातील सर्वात भीषण दुर्घटना म्हणून आजही टायटॅनिकचा उल्लेख होतो. टायटॅनिक दुर्घटनेत 1,517 जणांचा मृत्यू झाला होता. या जहाजाचे कॅप्टन एडवर्ड जॉन स्मिथ यांना जहाजासोबतच जलसमाधी मिळाली होती. मात्र फार कमी लोकांना माहित असेल की हे जहाज बनवणाऱ्या थॉमस अॅंड्रयूने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शेवटच्या श्वासापर्यंत लोकांना वाचवण्याचे काम केले होते. आज आम्ही टायटॅनिक संबंधी फारशा उजेडात न आलेल्या गोष्टी सांगणार आहोत.
अॅंड्रयू होता खरा हिरो
- या विशालकाय जहाजाला बनविणारा थॉमस अँड्रयू टायटॅनिकचा खरा हिरो मानला जातो. 7 फेब्रुवारी 1873 रोजी जन्मलेला अँड्रयू बिझनेसमॅनसोबतच शिप मेकर होता. थॉमसने टायटॅनिकचे डिझाइन तयार केले होते. 15 एप्रिल 1912 च्या रात्री टायटॅनिक आइसबर्गला धडकले होते. तेव्हाच अँड्रयू यांना कळाले होते की जहाज वाचणार नाही. मात्र त्यांनी स्वतःला वाचवण्याऐवजी लोकांचा जीव वाचण्याला प्राधान्य दिले.
शेवटच्या क्षणापर्यंत जहाजावर होते
- आइसबर्गला धडकल्यानंतर अँड्रयू यांनी प्रवाशांच्या रुममध्ये जाऊन त्यांना उठवण्यास सुरुवात केली होती. त्यांना त्वरित लाइफ बोटीवर पाठवले जात होते. त्यांना जास्तित जास्त लोकांना वाचवायचे होते. कॅप्टन जॉन स्मिथसह अँड्रयू हे शिप डुबेपर्यंत शिपवर होते. जहाजासोबतच त्यांनाही जलसमाधी मिळाली होती.
15 मिनिटांत नाही 3 तास लागले होते बुडायला
- त्याकाळातील सर्वात मोठे जहाज म्हणून गौरवल्या गेलेल्या टायटॅनिक बद्दल असे म्हटले गेले होते की हे जहाज कधीही बुडू शकणार नाही. मात्र 15 एप्रिल 1912 ला अपघात झाला आणि हे जहाज बुडाले. त्याबद्दल असेही म्हटले जाते की 15 मिनिटांत ते बुडाले, मात्र हे पूर्णपणे चुकीचे आहे. विशालकाय जहाज बुडायला 3 तास लागले होते.
पाण्याखाली एवढ्या अंतरावर सापडले होते
- जहाज बुडाल्यानंतर कित्येक वर्षानंतर अटलांटिक महासागरात 12 हजार फूट खोल सापडले होते. त्याचे अवशेष रॉबर्ट बेलार्डने शोधले होते. या जहाजावर 1997 मध्ये टायटॅनिक हा चित्रपट बनवला गेला होता.
वाचू शकले असते टायटॅनिक
- आइसबर्ग दिसला त्यानंतर 30 सेकंदांनी जहाज त्याला धडकले होते. एवढ्या वेळात जहाजाची दिशा बदलता आली असती आणि कदाचित समुद्री इतिहासातील सर्वात मोठा अपघात होता-होता वाचला असता.
पुढील स्लाइडमध्ये, टॅयटॅनिकचे रियल फोटो आणि रोचक माहिती...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.