आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यावर तरंगणारे बाजार पाहिले आहे का तुम्ही, 17 एअरकंडीशंड होड्यांमध्ये करु शकतात शॉपिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुर्ज खलीफा यांसारख्या बिल्डींगांसाठी दुबईत पहिले एक फ्लोटींग म्हणजेच तरंगणारे मार्केट सुरु होणार आहे. बीयूलँड कंपनी या आयडीयावर सध्या काम करत आहे. कंपनीचा फाउंडर शेखा माहा हशरने सांगितल्यानुसार या मेपर्यंत हे मार्केट सुरु होणार आहे. येथे 17 नावांमध्ये दुकाने आणि रेस्तरॉ असणार आहे.

 

मॉलमध्ये जाऊन जाऊन बोर होणाऱ्या लोकांसाठी ही आयडीया नक्कीच छान आहे.  त्यांनी सांगितले की बँकॉक येथील फ्लोटींग मार्केटपासून प्रेरीत होऊन त्यांनी असा उपक्रम दुबईमध्ये करण्याचा विचार केला. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यावर बोटींवर लोकांना शॉपिंग करण्यास नक्कीच आनंद वाटेल असे सांगितले.

 

90 लाख लोक येण्याचा विचार...

दुबई क्रिकवर फिरण्यासाठी जवळपास 2 किमीचा परिसर बनवण्यात आला आहे. येथेच हे मार्केट सुरु होणार आहे. येथे अनेक लोकल आणि इंटरनॅशनल ब्रँड असणार आहेत. कंपनीला विश्वास आहे ती पहिल्याच वर्षी या मार्केटमध्ये जवळपास 90 लाख लोक फिरण्यासाठी तसेच शॉपिंग करण्यासाठी येऊ शकतात.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, फ्लोटींग मार्केटचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...