आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुळ्या बहिणींच्या प्रेमात पडले जुळे भाऊ, लोक विचारतात - तुमचा गोंधळ उडणार नाही का!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत असे दोन कपल समोर आले आहेत, ज्यांना बघून तुम्ही अचंबित व्हाल. झाले असे, की येथे वास्तव्याला असलेले जुळे भाऊ जॉश आणि जेरेमी सेलर्स आता प्रेमात पडले आहेत. आणि हे ज्या दोन तरुणींच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत, त्यादेखील जुळ्या बहिणी आहेत. दोघांनीही ब्रिटनी आणि ब्रियाना या जुळ्या बहिणींना एकत्र प्रपोज केले आणि आता हे दोन कपल लवकरच विवाहबद्ध होणार आहे.

 

तुमचा गोंधळ उडणार नाही का, लोक विचारतात प्रश्न

- या दोन्ही कपलला सोशल मीडियावर अतिशय मजेशीर प्रश्न विचारले जात आहेत. लग्न तर करत आहात, पण हुबेहुब दिसत असल्याने तुमचा गोंधळ तर उडणार नाही ना? असे प्रश्न त्यांना विचारले जात आहेत. यासह अनक मजेशीर रिअॅक्शन त्यांना मिळत आहेत.


अशी झाली होती भेट...

- 34 वर्षीय जुळे भाऊ जॉश आणि जेरेमी सेलर्स यांची भेट 31 वर्षीय ब्रिटनी आणि ब्रियाना स्पियर्ससोबत एका फेस्टिव्हलमध्ये झाली होती. पहिल्याच भेटीत हे दोघे भाऊ या बहिणींच्या प्रेमात पडले आणि त्यांनी दोघींनी लग्नाची मागणी घातली.

 

फिल्मी स्टाइलने झाली भेट...
- जुळ्या बहिणींपैकी ब्रियानाने सांगितले, आम्ही फेस्टिव्हलमध्ये फिरत होतो, तेव्हा अचानक हे जुळे भाऊ आमच्यासमोर उभे झाले. ते आम्हाला बघत होते आणि आम्ही त्यांना... सर्वकाही स्लो मोशनमध्ये सुरु होते, अगदी एखाद्या चित्रपटाप्रमाणे. आमचा पुर्वजन्मावर विश्वास आहे. त्यामुळे गतजन्मातील जोडीदार आम्हाला या जन्मात मिळाले, असे आम्हाला वाटते. 
- ब्रियानाचा जेरेमीसोबत तर ब्रिटनीचा जोशसोबत साखरपुडा झाला आहे. आता हे चौघे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.


पुढील स्लाईड्सवर बघा, या जुळ्या बहीणभावंडांचे फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...