आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ALERT: मॉल, सार्वजनिक टॉयलेटमध्ये ही गोष्ट दिसताक्षणी पडा बाहेर, करा पोलिसांत तक्रार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तंत्रज्ञानाने आपल्या आयुष्याला जितके सहज बनवले तितकेच घातकही केले आहे. सोशल मीडियावर सध्या या डिव्हाइस संदर्भात चर्चा आहे. अतिशय सामान्य हँगर दिसणारी ही गोष्ट किती घातक आहे यावर लोक एकमेकांना सतर्क करत आहेत. प्रामुख्याने सार्वजनिक टॉयलेट, चेंजिंग रुम किंवा मॉलमध्ये ही गोष्ट प्रामुख्याने दिसून येत आहे. आपल्याला हा डिव्हाइस कुठेही दिसल्यास वेळीच बाहेर पडा. कारण, हँगर किंवा हुक दिसणारी ही गोष्ट एक सीक्रेट कॅमेरा आहे. 


कसे ओळखावे...
चेंजिंग रुम आणि पब्लिक टॉयलेटमध्ये कपडे, पर्स किंवा बॅग टांगण्यासाठी हुक असतात. परंतु, हे अतिशय सामान्य दिसणारे हे हुक तितकेही सामान्य नसतात. याचा गैरवापर सुद्धा होऊ शकतो. सिंग हुक सामान्य असतील परंतु, डबल हुक स्पाय कॅम असू शकतात. ते सहज कुठेही लावले जाऊ शकतात. यामध्ये कॅमेऱ्यासह चार्जर सुद्धा फिट केलेले असतात. हुकवर एक छोटेसे छिद्र असते. त्यातून फोटो आणि व्हिडिओ काढले जातात. हाच छिद्र पाहून तो कॅमेरा असल्याचे लक्षात येईल. 


पॉर्न साइट्सवर येत आहेत व्हिडिओ
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सार्वजनिक टॉयलेट आणि मॉलच्या चेंजिंग रुमचे व्हिडिओ अशाच कॅमेऱ्यांनी शूट केले जात आहेत. हे व्हिडिओ पॉर्न साइट्सवर अपलोड होत आहेत. एका मैल अंतरावरून सुद्धा हे कॅमेरे सहज व्हिडिओ शूट करू शकतात. आसपासच्या कॅमेऱ्यांवर नजर ठेवता येईल. परंतु, एका मैल अंतरावरून शूट केले जाणारे व्हिडिओ कुणाच्या लक्षात येत नाहीत. त्यामुळे हे कॅमेरे अतिशय घातक असल्याचे दिसून येते.


नेहमी लक्षात ठेवा...
- कुठल्याही दुकान, शॉपिंग मॉल किंवा पब्लिक टॉयलेटमध्ये जाताच सर्वप्रथम बारकाइने लक्ष देऊन संशयास्पद वस्तूंचा शोध घ्यावा. काही विचित्र दिसून आल्यास वेळीच त्यातून बाहेर पडावे. अशा प्रकारचे हँगर्स किंवा हुक दिसल्यास त्याचे बारकाईने निरीक्षण करावे.
- अनेकवेळा कॅमेरे आरशांमागे सुद्धा लावले जातात. आरसा संशयास्पद दिसून आल्यास आपल्या मोबाईलचे फ्लॅश लाइट ऑन करा आणि त्या मिररला फ्लॅश चिटकून पलिकडे पाहण्याचा प्रयत्न करा. काही गडबड असल्यास आपल्याला आरशापलिकडील दृश्य दिसेल.
- आपण वापरत असलेल्या चेंजिंग रुममध्ये कुठल्याही प्रकारचा छिद्र किंवा वेंट असू नये. महिलांनी यावर खास लक्ष द्यावे.

 

बातम्या आणखी आहेत...