आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

23 डिग्रीच्या किरकोळ तापमानावर बेशुध्द होत होते लोक, जाणून घ्या का झाले असे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात जोपर्यंत 40-45 डिग्रीचे तापमान होत नाही, तोपर्यंत आपल्याला उष्णतेची जाणीव होत नाही. परंतू ब्रिटेनमध्ये सध्या सुरु असलेल्या मॅरेथॉनमध्ये असे काही घडले की, लोक पाहत राहिले. मॅरेथॉनमध्ये भाग घेणारे जास्तीत जास्त लोक फिनिश लाइनपर्यंत पोहोचू शकले नाही. कारण येथे मोठ्या प्रमाणात उष्णता होती. येथील तापमान 23 डिग्री सेल्सिअसवर असतानाच लोक बेशुध्द होऊ लागले.


ट्रॅकवरच झाले बेशुध्द
- जास्तीत जास्त लोक ट्रॅकवरच बेशुध्द झाले. यानंतर एमरजेंसी सर्विसेजने मोर्चा सांभाळला. ब्रिटनेच्या हवामान विभागानुसार आतापर्यंत एप्रिलमध्ये यापेक्षा जास्त उष्णता कधीच झाली नाही. यावर्षी तापमान 10 डिग्री जास्त आहे. 2011 मध्ये खुप उष्णता होती परंतू पारा 27 डिग्रीच्या वर गेला नाही. 1949 मध्ये पारा 28 डिग्रीच्या वर गेला होता. आता हा पारा 28 पेक्षा जास्त होणार असल्याचे मानले जातेय. असे झाले तर 70 वर्षांचा रेकॉर्ड मोडून निघेल.

 

घरात राहण्याचा दिला जातोय सल्ला
- हवामान विभागाकडून लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले जातेय. शहरात उष्णतेमुळे प्रदूषणही जास्त असेल. अशावेळी हार्ट आणि श्वासांचा आजार असणा-यांनी सांभाळून राहणे गरजेचे आहे. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा मॅराथनमध्ये बेशुध्द झालेले लोक...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...