आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रत्येक कुटुंब कोट्यधीश असलेले एखादे गाव कधी तुम्ही बघितले आहे का? विश्वास बसत नाही ना? पण हे खरे आहे. आपल्या देशात असे एक गाव आहे, ज्याची चर्चा जगभरात होत आहे. अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यात असलेल्या बोमजा गावाचे आशियातील सर्वात श्रीमंत गावांच्या यादीत नाव सामील झाले आहे. झाले असे, की येथे भारतीय सेनेने एका प्रोजेक्ट सुरु करण्यासाठी येथील गावातील जमीन अधिग्रहण केली. त्यातून गावातील प्रत्येक कुटुंबाला कोट्यवधी रुपये मिळाले.
किती मिळाले पैसे....
- मीडिया रिपोर्ट्सनुसार बोमजा गावात आर्मी तवांग गैरसनचे आणखी एक युनिट बनवायचे होते. त्यामुळे डिफेन्स मिनिस्ट्रीने जमीनीच्या मोबदल्यात गावक-यांना एक-एक कोटी रुपये भरपाई दिली.
- एकुण 200.056 एकर जमीनीच्या मोबदल्यात गावातील 31 कुटुंबाना रक्षा मंत्रालयाच्या वतीने 40.8 कोटींचा चेक दिला. अरुणाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी कुटुंबीयांना चेक सोपवले.
दोन कुटुंबाना एक कोटीपेक्षा अधिक रक्कम
- 31 कुटुंबांपैकी 29 कुटुंबीयांच्या बँक खातेत 1.09 कोटी रुपये जमा झाले. तर दोन कुटुंबापैकी एका कुटुंबाला 2.4 कोटी तर दुस-या कुटुंबाला 6.7 कोटी रुपये मिळाले.
पुढे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.