आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगात या ठिकाणाचे नाव आहे सर्वात छोटे, या 7 गोष्टी तुम्हाला माहिती नसतील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगात एक असे ठिकाण आहे, जे सर्वात छोट्या नावासाठी ओळखले जाते. या ठिकाणाचे नाव 'A' आहे. A हे या गावाचे नाव आहे. हे गाव नॉर्वे आणि स्वीडन जवळील एका आयलँडवर आहे. आज आम्ही तुम्हाला पृथ्वीवरील अशाच काही मजेदार आणि अनोख्या गोष्टींविषयी सांगणार आहोत. 


इतके लहान नाव का? 
जगातील प्रसिध्द असणा-या या ठिकाणाचे नाव मुद्दामून ठेवण्यात आलेले नाही. येथील लोकल भाषेमध्ये A चा अर्थ म्हणजे नदी. याच कारणांमुळे लोफोटीन आयलँडच्या या गावाला हे नाव देण्यात आले. आज जगभरातील पर्यटक हे ठिकाण पाहण्यासाठी जातात.

 

येवढी आहे लोकसंख्या
या गावाच्या नावा प्रमाणेच येथील लोकसंख्याही कमी आहे. येथे फक्त 150 लोक राहतात.

 

अनेक वेळा चोरी झाले नाव
- या गावाबाहेर रोडवर लावलेले 'A' नावाचा साइन बोर्ड अनेक वेळा गायब झाला आहे. यानंतर लोक अथॉरिटीने याचे नाव बदलून A i Lofoten ठेवले होते. परंतू येथे राहणा-या लोकांना हे आवडले नाही. यामुळे पुन्हा 'A' असे नाव ठेवण्यात आले.

 

A to B day निर्माण झाला
- 2004 मध्ये ब्रिटश लेखक आणि व्यंगकाराने जगाला आश्चर्यात टाकले. ते म्हणाले की, मी A ते B पर्यंत सायकल प्रवास करेल. हे ऐकून लोकांना हसू आले. परंतू जेव्हा त्याने नॉर्वेच्या A ते नेबरास्काच्या Bee पर्यंत प्रवास केला. तेव्हा लोक चकीत झाले. तीन महिन्यांनंतर ते ए पासून बीपर्यंत पोहोचले. तो दिवस तेथील मेयरने A to B day घोषित केला. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, पृथ्वी ते चंद्राचे अंतर येथे आहे कमी...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...